अनुज गुप्ता, प्रतिनिधी उन्नाव, 14 मार्च : देशात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्नावच्या गंगाघाट कोतवाली परिसरात रेल्वे रुळावर तरुणी आणि तरुणाचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तेथे पडलेल्या मृतदेहाची माहिती मालगाडीच्या चालकाने नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर गंगाघाट पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे हात कापडाने बांधलेले होते, तर दोघांच्याही चेहऱ्यावर जखमा आहेत. या तरुणाचा मृतदेह काही फूट अंतरावर पडला होता. तरूण आणि महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाल्याची माहिती मिळताच अतिरिक्त एसपी शशिशेखर सिंह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास केला. उन्नावच्या गंगाघाट कोतवाली भागातील चंपापुरवा नेतुआ मार्गावर असलेल्या गगनी खेडा कान्हा गोशाळेसमोर रेल्वे रुळावर हे मृतदेह आढळून आले. मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक जमा झाले. आज सकाळी कानपूरहून लखनऊला जाणाऱ्या मालगाडीच्या लोको पायलटला कान्हा गोशाळेसमोरील पोल क्रमांक 65/24जवळ एक तरुण आणि एका महिलेचा मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी ही माहिती गंगाघाट पोलीस आणि आरपीएफला दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. प्रेमी युगल नात्याने भाऊ-बहीण - असे सांगितले जात आहे की, हो दोन्ही चुलत भाऊ-बहीण आहेत. मात्र, दोघांचे प्रेमसंबंध होते. घटनास्थळापासून काही अंतरावर एक दुचाकीही उभी असल्याचे आढळून आली. अतिरिक्त एसपी शशिशेखर सिंह यांनी सांगितले की, प्रेमी युगुलाचा मृतदेह सापडला आहे. दोघेही एकमेकांचे नात्याताली भाऊ-बहीण होते. प्राथमिक तपासात रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू आहे. घरवाल्यांचा होता या प्रेमसंबंधांना विरोध - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजबहादूर हा तरुण कानपूरच्या इंदलपूर पोस्ट पचौर गावचा रहिवासी होता, तर शिवाली ही तरुणी कानपूर देहाटमधील हथकुडवा बैरी गावची रहिवासी होती. दोन्ही नात्यात चुलत भाऊ-बहीण होते. मात्र, दोघांमध्ये अफेअर सुरू होते. शौचालयाला गेली महिला, नराधमाने साधला डाव अन् केलं भयानक कृत्य दुसरीकडे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या कुटुंबीयांना तरुण आणि युवतीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली होती आणि दोघांचे कुटुंबीय या नात्याला विरोध करत होते. रविवारी सायंकाळी दोघेही घरातून बाहेर पडले होते, आज त्यांचे मृतदेह रुळावर पडलेले आढळले. आत्महत्येचे प्रकरण - घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिशेखर सिंह यांनी सांगितले की, प्रेमी युगुलाचे मृतदेह सापडले आहेत. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.