आपल्या हातून बापाचा मृत्यू झाल्याचं पाहून मुलगा भानावर आला आणि प्रचंड घाबरला.
अनुप पासवान, प्रतिनिधी कोरबा, 23 जून : दारूच्या आहारी जाऊन घरातील वातावरण कलुषित करणाऱ्या जन्मदात्या बापाचा पोटच्या मुलानेच जीव घेतल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडच्या कोरबी पोलीस ठाणा हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हेगाराला ताब्यात घेतलं असून त्याने हत्येसाठी वापरलेला फावडाही जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली त्यादिवशीदेखील रुपसिंह दारू पिऊन घरी आला आणि घरात नेहमीप्रमाणे तमाशा घालण्यास सुरुवात केली. ही रोजची कटकट त्याच्या कुटुंबियांना सहन व्हायची नाही. त्यामुळे या दिवशी रुपसिंहच्या शिव्या ऐकून रागाच्याभरात त्याचा मुलगा संतराम याने घरातील फावड्याने त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली.
रुपसिंहला हे वार सहन झाले नाहीत. त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊ लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. रागाने लालबुंद झालेला संतराम आपल्या हातून बापाचा मृत्यू झाल्याचं पाहून भानावर आला आणि प्रचंड घाबरला. भीतीपोटी तातडीने त्याने रुपसिंहचा मृतदेह गावाबाहेरील नाल्याजवळ नेऊन ठेवला आणि कोणालाही संशय येऊ नये यासाठी रक्ताने माखलेले त्याचे कपडे, हातोडा लपवून ठेवला. Viral Video: बापरे! व्यक्तीची वाघासोबत मस्ती, अंगावर झोपून केलं KISS, पाहून व्हाल शॉक या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी संतरामची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र पोलिसांनी कडक कारवाई केल्यानंतर त्याने आपला गुन्हा दाखल कबूल केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून फावडा आणि रक्ताने माखलेले कपडेही जप्त केले आहेत.