नवी दिल्ली 23 जून : वाघाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओमध्ये ते माणसांवर हल्ला करताना दिसतात, तर काही व्हिडिओंमध्ये जंगली प्राण्यांची शिकार करताना दिसतात. त्यामुळे वाघाचं नाव काढलं तरी अनेकांना भीती वाटते. मात्र, आता एका व्यक्तीचा असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हीही तोंडात बोट घालाल. तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला वाघाला किस करताना आणि त्याच्यासोबत मस्ती करताना पाहिलं आहे का? 5 किंग कोब्रा समोर फणा काढून बसले होते, तरीही त्यांना KISS करायला गेला व्यक्ती अन्.., Shocking Video सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे दृश्य पाहायला मिळतं. या व्यक्तीची हिंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल. @gulyaet_tigr या इंस्टाग्राम अकाउंटवर वाघाशी संबंधित अनेक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच यावर एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती चक्क वाघाला किस करत असल्याचं पाहायला मिळतं. त्याच्या धाडसाचं कौतुक करायचं की हा त्याचा वेडेपणा समजायचा हे तुम्हीच ठरवा. कदाचित तो या वाघासोबत बराच वेळ घालवतो, त्यामुळे तो एवढी हिंमत करतो. मात्र हिंस्त्र प्राणी कधी भडकतील आणि कोणावर हल्ला करतील, हे कोणीच सांगू शकत नाही.
हे सगळं करण्यासाठी मोठं धाडस लागतं, हे मात्र नक्की. निर्भय हे दृश्य एखाद्या उद्यानाचं असल्यासारखं वाटतं. कारण आजूबाजूला जंगलासारखी झाडं दिसतात. त्यांच्या मध्ये एक वाघ जमिनीवर पडलेला आहे आणि हा माणूस त्या वाघाच्या वरती उभा आहे. त्याने वाघाचं तोंड आपल्या दोन्ही हातांनी पकडून त्याला किस केलं. यानंतर तो वाघाच्या मानेला गुदगुल्या करू लागला. वाघही अगदी शांतपणे जमिनीवर पडून याची मजा घेताना दिसला. या व्हिडिओला आतापर्यंत 42 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं की, या प्राण्याच्या आत खूप प्रेम दिसत आहे. तर दुसऱ्याने म्हटलं, की ती व्यक्ती खूप भाग्यवान आहे, जिच्याकडे इतका सुंदर प्राणी आहे. आणखी एकाने म्हटलं, की एक दिवस असा येईल जेव्हा वाघ पाळीव प्राणी आहे हे विसरून त्या व्यक्तीवर हल्ला करेल. इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.