JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / लवकरच Covishield आणि Covaxin बाजारात विक्रीसाठी मान्यता मिळणार, जाणून घ्या काय असेल त्यांची किंमत

लवकरच Covishield आणि Covaxin बाजारात विक्रीसाठी मान्यता मिळणार, जाणून घ्या काय असेल त्यांची किंमत

Corona Virus Vaccines: देशातील Covishield आणि Covaxin या अँटी-कोविड-19 लसी (Anti Covid-19 vaccines) लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 जानेवारी: देशातील Covishield आणि Covaxin या अँटी-कोविड-19 लसी (Anti Covid-19 vaccines) लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही लसींना लवकरच त्यांच्या विक्रीसाठी भारताच्या औषध नियामकाकडून मान्यता मिळण्याची शक्यता हे. याची किंमत प्रति डोस 275 रुपये असण्याची शक्यता आहे आणि 150 रुपये अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाऊ शकतात. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (National Pharmaceutical Pricing Authority, NPPA) ला लसींना आर्थिकदृष्ट्या कमी किंमतीत बनवण्यासाठी लसींच्या किंमती मर्यादित करण्याच्या दिशेनं काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आतापर्यंत, खासगी रुग्णालयांमध्ये कोवॅक्सिनची (Covaxin) किंमत प्रति डोस 1,200 रुपये आणि कोविशील्डची (Covisheeld) किंमत प्रति डोस 780 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या किंमतींमध्ये 150 रुपये सेवा शुल्क समाविष्ट आहे. या दोन्ही लसी केवळ देशात आपत्कालीन वापरासाठी अधिकृत आहेत. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या COVID-19 वरील विषय तज्ज्ञ समितीने, 19 जानेवारी रोजी, Covishield आणि Covaxin ची काही अटींसह प्रौढांसाठी नियमितपणे विक्री करण्यास मान्यता देण्याची शिफारस केली होती.

चहा तर सगळेच बनवतात; या ट्रिक्स वापराल तर सगळे म्हणतील.. चहा असावा तर अस्साच

संबंधित बातम्या

एका अधिकृत सूत्राने सांगितले की नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (National Pharmaceutical Pricing Authority, NPPA) ला ते स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करण्यास सांगितले आहे. लसीची किंमत प्रति डोस 275 रुपये आणि 150 रुपये अतिरिक्त सेवा शुल्कासह मर्यादित केली जाण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक (सरकारी आणि नियामक व्यवहार) प्रकाश कुमार सिंग यांनी 25 ऑक्टोबर रोजी भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांना कोविडशील्ड लस नियमित बाजारात लॉन्च करण्यासाठी मंजूरी मागणारा अर्ज सादर केला होता. काही आठवड्यांपूर्वी भारत बायोटेकचे (Bharat Biotech) पूर्णवेळ संचालक व्ही. कृष्ण मोहन (V. Krishna Mohan)यांनी कोवॅक्सिनला नियमित बाजारात आणण्याची मागणी केली आणि प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल डेटासह, रासायनिक, उत्पादन आणि उत्पादनातील नियंत्रणाची संपूर्ण माहिती सादर केली होती.

BREAKING : गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांचा एकाच गाडीतून प्रवास, VIDEO मुळे चर्चांना उधाण

 गेल्या वर्षी 3 जानेवारी रोजी, कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या अँटी-कोविड-१९ लसींना देशात आणीबाणीच्या वापरासाठी (Emergency Use Authorisation, EUA) मान्यता देण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या