JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / मोठा दिलासा! खतरनाक Omicron चा धोका कमी करण्याचा मार्ग सापडला; आरोग्यमंत्र्यांचा दावा

मोठा दिलासा! खतरनाक Omicron चा धोका कमी करण्याचा मार्ग सापडला; आरोग्यमंत्र्यांचा दावा

जगातील काही देशांमध्ये थैमान घालणाऱ्या ओमिक्रॉनने (Omicron) आता भारतातही शिरकाव (Omicron in India) केल्याने चिंता वाढली आहे. मात्र याबाबत एक सकारात्मक माहिती समोर आली आहे.

जाहिरात

दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या एक 33 वर्षीय तरुण हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेत आढळलेला (South Africa) कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने (Omicron) आता भारतातही शिरकाव केला आहे. ओमिक्रॉन हा अधिक संसर्गजन्य असल्यानं अनेक देशांनी त्याचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. काही देशांनी कडक निर्बंध जारी केले आहेत. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. ओमिक्रॉनमुळे जागतिक पातळीवर एकूणच चिंतेचं वातावरण असताना इस्रायलमधून (Israel) मात्र याबाबत एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. ओमिक्रॉन या व्हेरिएंटवर सध्या दिल्या जाणाऱ्या कोरोना लशी  (Vaccine) किती प्रभावी आहे, याविषयी जगभरातले संशोधक संशोधन करत असून, त्याबाबतचा डेटा अद्याप हाती आलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर इस्रायलचे आरोग्यमंत्री निटनाज होरोविट्झ (Health Minister Nitnaz Horowitz) यांनी सांगितलं, की ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत काही गोष्टी आशादायी असल्याचं सुरुवातीच्या संकेतांवरून दिसून येतं. ज्या नागरिकांनी गेल्या सहा महिन्यांत फायझर लशीचा (Pfizer Vaccine) दुसरा डोस किंवा बूस्टर डोस घेतला आहे, त्यांना या व्हेरिएंटपासून विशेष धोका नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. परंतु, हा दावा करताना त्यांनी कोणताही डेटा दिलेला नाही. हे वाचा -   Explainer: कसा लागला ओमिक्रॉनचा शोध? विषाणूचे नवीन प्रकार शोधण्याची पद्धत कोणती? आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिल्यानंतर इस्रायलमधल्या एका न्यूज चॅनेलने दावा केला, की फायझरची लस ओमिक्रॉन व्हॅरिएंटवर 90 टक्के प्रभावी आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Variant) तुलनेत केवळ 1.3 पट संसर्गजन्य आहे. यानंतर इस्रायलमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा 2 नागरिकांना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर ही संख्या 4वर पोहोचली. ओमिक्रॉन व्हॅरिएंटला रोखण्यासाठी इस्रायलनं रविवारी (28 नोव्हेंबर) देशाच्या सीमांवरील मार्ग बंद केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या