JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Omicron नैसर्गिक लसीप्रमाणे काम करत असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा! काय आहे तथ्य?

Omicron नैसर्गिक लसीप्रमाणे काम करत असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा! काय आहे तथ्य?

जेव्हापासून कोरोना महामारी पसरत आहे, तेव्हापासून शास्त्रज्ञांचा एक वर्ग ओमिक्रॉन (omicron) प्रकाराला एक महत्त्वाची आणि चांगली बातमी म्हणून पाहत आहे. तज्ज्ञ याला एक नैसर्गिक लस मानत आहेत जी गंभीर लक्षणे निर्माण न करता उच्च पातळीवरील अँटीबॉडीज तयार करण्याचे काम करत आहे.

जाहिरात

Omicron Variant america

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जानेवारी : राज्यासह देशात कोरोना संसर्गाची (Corona) तिसरी लाट रोज नवे उच्चांक गाठताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनाव्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन (New Variant Omicron) प्रकारात रुग्णांमध्ये केवळ सौम्य लक्षणे दिसत आहेत. दक्षिण आफ्रिकेतून सातत्याने येत असलेल्या अहवालांच्या आधारे तज्ज्ञ असा दावा करत आहेत. आता शास्त्रज्ञ आणि आघाडीचे आरोग्य तज्ञ देखील याच्याशी सहमत दर्शवत आहेत. ओमिक्रॉनने संक्रमित लोकांना याचा फायदा होत असून संसर्गानंतर शरीरात अशा अँटीबॉडी तयार होतात ज्या लसीपेक्षा अधिक प्रभावी आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून ओमिक्रॉन व्हेरिएंटला साथीचा अंत म्हणून पाहिले जात आहे. तज्ज्ञ याला एक नैसर्गिक लस मानत आहेत जी गंभीर लक्षणे निर्माण न करता उच्च पातळीवरील अँटीबॉडीज तयार करण्याचे काम करत आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हा प्रकार जगभरातील लाखो संक्रमित लोकांच्या शरीरात नैसर्गिक लसीप्रमाणे काम करत आहे. यामध्ये, शरीर संपूर्ण अँटीबॉडीज तयार करत आहे जे संसर्गामुळे होणारे जंतू नष्ट करतात. भारतातील पोर्टिया मेमेडिकलच्या (Portea MeMedical) वैद्यकीय सेवेचे अध्यक्ष डॉ. विशाल सहगल यांनी टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘ओमिक्रॉन शरीरात नैसर्गिक लसीप्रमाणे काम करत आहे. हे कमी जोखमीसह फायदेशीर आहे. सौम्य लक्षणांसह उच्च पातळीच्या संसर्गामुळे नवीन प्रकार वरदान ठरतो. काही तज्ञ असेही म्हणत आहेत की ओमिक्रॉनची लागण झालेल्या लोकांना यापुढे लसीकरण करण्याची आवश्यकता नाही. काय म्हणावं याला! म्हणे, ‘मला हवी कोरोना पॉझिटिव्ह तरुणी’, पैसे देण्याचीही तयारी आण्विक जीवशास्त्रज्ञ निकानोर ऑस्ट्रियाको या विषयावर म्हणतात, ‘आम्हाला वाटते की ओमिक्रॉन ही साथीच्या समाप्तीची सुरुवात आहे. ओमिक्रॉन (Omicron) लोकांमध्ये एक प्रकारची प्रतिकारशक्ती वाढवत आहे, ज्यामुळे आपण पुन्हा पूर्वीप्रमाणे मुक्तपणे जगू शकतो. एक चांगली गोष्ट म्हणजे जिथे पहिल्यांदा ओमिक्रोन आढळला त्या दक्षिण आफ्रिकेत त्याचा संसर्ग दर झपाट्याने कमी होत आहे. ताज्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की गेल्या 30 दिवसांत देशात नवीन संसर्गाचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. बहुतेक तज्ञांचे असे मत आहे की ओमिक्रॉनची लाट दक्षिण आफ्रिकेतून गेली आहे आणि आता पुढील काही महिन्यांत जगातील सर्व देशांमध्ये असेच काही घडण्याची शक्यता आहे. कोरोना काळात Doloची भरमसाठ विक्री;खपलेल्या गोळ्या एकत्र केल्यास बनेल बुर्ज खलिफा दुसरीकडे काही आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की ओमिक्रॉनला नैसर्गिक लस म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे, अनेक लोक यामुळे गंभीर आजारी पडत आहेत. या नवीन प्रकाराला हलक्यात घेण्याची चूक करू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या