JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Kovid Kapoor: 'माझं नाव कोविड आहे आणि मी Virus नाहीये', अजब नावाची गजब कहाणी!

Kovid Kapoor: 'माझं नाव कोविड आहे आणि मी Virus नाहीये', अजब नावाची गजब कहाणी!

दुर्दैवानं कोविड कपूर (Kovid Kapoor from Bengaluru) या व्यक्तीला जगातील हे सर्वात अनोखं नाव मिळालं आहे. कॉफी शॉपमध्ये जर त्यांना या नावानं कोणी मोठ्यानं हाक मारली तर हे नाव ऐकून सगळ्यांनाच क्षणभर धक्का बसतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बेंगळुर, 09 फेब्रुवारी: 31 वर्षापूर्वी तुमचं नाव कोविड कपूर ठेवण्यात आलं होतं आणि कोविड महामारीमुळे सर्वांना तुमचं नाव आता विचित्र वाटू लागलं आहे, अशी क्षणभर कल्पना करा. कल्पनाच भयंकर आहे, नाही का? दुर्दैवानं कोविड कपूर (Kovid Kapoor from Bengaluru) या व्यक्तीला जगातील हे सर्वात अनोखं नाव मिळालं आहे. कॉफी शॉपमध्ये जर त्यांना या नावानं कोणी मोठ्यानं हाक मारली तर हे नाव ऐकून सगळ्यांनाच क्षणभर धक्का बसतो. जगातील सर्वात अनोख्या आणि आजच्या काळात दुर्दैवी मानल्या जाणाऱ्या नावामुळे गेल्या दोन वर्षांत कोविड कपूर यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. याबाबतचा खुलासा त्यांनी नुकताच प्रसार माध्यमांसमोर केला आहे. ‘मी जिथे जातो, तिथे लोकं माझं नाव ऐकून आश्चर्यचकित होतात’, असं बेंगळुरूच्या (Bengaluru Kovid Kapoor) कोविड कपूर यांनी सांगितलं. पण ते मान्य करतात की हे सर्व वाईट नाही. माझ्या नावामुळे मी आता कायमस्वरूपी कोरोनाव्हायरसशी (Coronavirus) जोडला गेलो आहे, असं कोविड कपूर सांगतात. तथापि, कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) सुरवातीच्या टप्प्यात कोविड कपूर यांना काही गोष्टींना तोंड देणं अवघड गेलं. सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या नावावरून विनोद सुरू झाल्यानं, त्यांना काहीसा धक्का बसला. हे वाचा- किराणा दुकानात-सुपरमार्केटमध्ये वाइन आल्यापासून सुरू आहेत भरभरून डिस्काउंट ऑफर्स कोविड चालवतात ट्रॅव्हल एजन्सी एका ट्रॅव्हल एजन्सीचे (Travel Agency) मालक असलेल्या 31 वर्षांच्या कोविड कपूर यांनी सांगितलं की, ‘ही दोन वर्षं मला पुरती वेड लावणारी ठरली. जेव्हा डब्ल्यूएचओनं (WHO) कोरोना महामारीचं अधिकृत नाव जाहीर केलं तेव्हा मला समजलं की या साथीच्या नावात आणि माझ्या नावात साम्य आहे. मात्र मी याबाबत काही करू शकलो नाही. हा अतिशय आश्चर्यकारक योगायोग होता.’ ‘जेव्हा 2019 च्या अखेरीस कोरोना विषाणू पहिल्यांदा जगासमोर आला. तेव्हापासून माझे मित्र आणि कुटुंबीयांमध्ये जोक्स आणि मीम्सची (Memes) कधीही न संपणारी चढाओढ सुरू झाली. माझ्या नावानं सुरू झालेले जोक्स (Jokes) हे लवकरच घराची आणि मित्रमंडळींची हद्द ओलंडून सार्वजनिक ठिकाणीही पोहोचतील, याचा मला अंदाजही नव्हता. जेव्हा जेव्हा रेस्टॉरंटमध्ये माझे नाव पुकारले जाते, तेव्हा आजूबाजूचे लोक माझ्याकडे एकटक पाहू लागतात, ही बाब माझ्या लक्षात आली. कधीकधी माझे मित्र सार्वजनिक ठिकाणी माझं नाव मोठ्यानं घेतात, तेव्हा बरेच लोक माझ्याकडं विनोदाच्या दृष्टीतून पाहतात. ही बाब मला आता मनोरंजक वाटते’, असं कोविड कपूर यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. हे वाचा- Corona च्या महामारीत आनंदाची बातमी, भारतातला पहिला Nasal Spray लॉन्च ‘हे माझं खोटं नाव आहे किंवा विनोद म्हणून मी माझं नाव बदललं आहे’, असं बऱ्याच लोकांना वाटतं. गेल्या वर्षी माझ्या 30 व्या वाढदिवसानिमित्त मित्रांनी केक ऑर्डर केला होता. पण बेकरला वाटले की नावात काहीतरी चूक असावी, म्हणून त्याने माझं नाव बदलून Kovid ऐवजी Covid केलं. अशा छोट्या छोट्या गमतीदार घटनांची माझ्याकडे मोठी यादी आहे. विमानतळ आणि हॉटेल्समध्ये मला सतत माझ्या नावावरून जोक्सना सामोरं जावं लागतं, असं कोविड कपूर यांनी सांगितलं. हे वाचा- जन्मापासून महिलेला येत नव्हता कशाचाच वास; कोरोनाची लागण होताच झाला मोठा चमत्कार विमानतळावरील सुरक्षा आणि इमिग्रेशन अधिकारी हसत म्हणतात की, ‘अच्छा, आता कोविड श्रीलंकेत चालला आहे’. जेव्हा कोविड कपूर एखाद्या हॉटेलमध्ये जातात तेव्हा तिथले कर्मचारी, ‘आम्हाला आशा आहे की तुमची खोली क्वारंटाइन ठेवण्याची गरज भासणार नाही’, असं म्हणत त्यांची चेष्टा करतात. एका ट्रॅव्हल कंपनीचे मालक असलेले कोविड कपूर नंतरच्या काळात सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल झाले. कारण कोविड कपूर यांनी स्वतःच्या नावाची खिल्ली उडवत, ‘माझे नाव कोविड आहे आणि मी व्हायरस नाही’, असं लिहित पोस्ट केली होती. हे विनोद आता आयुष्यभर असेच सुरू राहणार, याची जाणीव कोविड कपूर यांना आता झाली आहे. ‘आता या गोष्टींचा मला त्रास होत नाही. लोकांनी देखील नाराज न होता, स्वतःवर थोडंसं हसायला हवं’, असं कोविड कपूर म्हणतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या