JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Omicron संदर्भात जीनोम सिक्वेन्सिंगची रणनिती बदलणार! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय

Omicron संदर्भात जीनोम सिक्वेन्सिंगची रणनिती बदलणार! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय

देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये अचानक वाढ होत असताना आरोग्य मंत्रालयाने ओमिक्रॉनबाबत (Omicron) जीनोम सिक्वेन्सिंगची (Genome Sequencing) रणनीती बदलली आहे. रूग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आणि मृत्यू झालेल्या रूग्णांच्या नमुन्यांचेही आता जीनोम सिक्वेन्सिंग केले जाईल.

जाहिरात

omicron

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 जानेवारी : भारतात कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) नवीन प्रकरणांमध्ये अचानक वाढ होत असताना, आरोग्य मंत्रालयाने ओमिक्रॉनच्या (Omicron) संदर्भात जीनोम सिक्वेन्सिंगची रणनीती बदलली आहे. ओमिक्रॉनचा प्रभाव निश्चित करण्यासाठी आणि कोणत्याही ठोस परिणामांवर पोहोचण्यासाठी रुग्णालयांमधील नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) करण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल झालेल्या आणि मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नमुन्याचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग किती धोकादायक आहे हे तपासण्यासाठी ही योजना आखण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जीनोम सिक्वेन्सिंगची नवीन रणनीती तीन दिवसांपासून कार्यरत आहे. एका आठवड्याच्या आत, ओमिक्रॉनशी संबंधित प्रारंभिक डेटा ठोस स्वरूपात येईल. भारतीय लोकसंख्येमध्ये वेगाने पसरणाऱ्या व्हेरिएंटची (variant) तीव्रता इंडेक्स यात मोजण्याचा उद्देश आहे. उच्च अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार केंद्राने सर्व राज्यांना खाजगी आणि सरकारी दोन्ही रुग्णालयांमधून जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यास सांगितले आहे. corona virus : 8 महिने उपचार, 8 कोटी रुपये खर्च; तरीही वाचू शकला नाही शेतकऱ्याचा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉनपूर्वी या आजारावर (illness) लक्ष दिले जात होते आणि आता त्याची तीव्रता (severity) पाहण्यास प्राधान्य दिले जात आहे. सुरुवातीला सामान्य लोकसंख्येच्या नमुन्याचे जीनोम सिक्वेन्सिंग हे ओमिक्रॉन आहे की नाही आणि किती आहे हे शोधण्यासाठी केले गेले. रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे आणि त्यामुळे मृत्यूही होत आहेत. तीव्रतेबाबतचे प्राथमिक निकाल आठवडाभरात उपलब्ध होतील. जर एखाद्याने अद्याप Corona Vaccine घेतली नसेल तर कायदेशीररित्या काय होईल? गेल्या 24 तासांत देशभरात ओमिक्रॉनच्या 620 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. नवीन प्रकरणांच्या आगमनाने, देशातील ओमिक्रॉन प्रकरणांची एकूण संख्या 5,488 वर पोहोचली आहे. ओमिक्रॉनच्या एकूण संक्रमितांपैकी 2,162 रुग्ण बरे झाले आहेत. ओमिक्रॉनचे बुधवारी 407, मंगळवारी 428 आणि सोमवारी 410 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या