JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / तुरुंगवास, बेपत्ता किंवा मृत्यूः चीनमध्ये कोरोनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना केलं जातंय लक्ष्य!

तुरुंगवास, बेपत्ता किंवा मृत्यूः चीनमध्ये कोरोनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना केलं जातंय लक्ष्य!

चिनी ड्रॅगन (China) कोरोनाशी संबंधित माहिती बाहेरील जगापर्यंत जाण्यापासून सतत रोखत आहे. अनेक पत्रकार (Journalist) आणि कार्यकर्त्यांनी (Activist) कोरोनावर वार्तांकन करण्यासाठी मोठी किंमत मोजली आहे. महिला पत्रकार झांग झान हिलाही कोरोनाबाबत वार्तांकन केल्याबद्दल 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 4 जानेवारी : कोरोना साथीच्या (Covid-19 Pandemic) सुरुवातीपासूनच चीन (China) संशयाच्या भोवऱ्यात आहे. यामुळे जगभरातून चीनवर टीका होत असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) विशेष पथकालाही चीनने योग्य प्रकारे तपास करण्यास परवानगी दिली नाही. वास्तविक, हा ड्रॅगन कोरोनाशी संबंधित माहिती बाहेरच्या जगापर्यंत जाण्यापासून सतत रोखत आहे. अनेक पत्रकार (Journalist) आणि कार्यकर्त्यांना (Activist) कोरोनावर वार्तांकन करण्यासाठी मोठी किंमत मोजली आहे. चीनने मुक्त पत्रकारितेविरुद्ध युद्ध पुकारल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. जे लोक कोरोनाबद्दल सत्य समोर आणत आहेत त्यांना लक्ष्य केलं जात आहे. द गार्डियनमधील वृत्तानुसार, इंडोनेशियामध्ये राहणारा एक चिनी नागरिक, चेन कुन याला माहिती मिळाली की चिनी पोलीस त्याला त्याच्या देशात परत चौकशीसाठी घेऊन जाणार आहे. आपल्या भावाच्या एका वेबसाईटमुळे हे सर्व घडत असल्याचे चेन कुनच्या लगेच लक्षात आलं. खरंतर चेनचा भाऊ चीनमध्ये टर्मिनस 2049 नावाची वेबसाइट चालवतात, ज्यामध्ये MeToo चळवळ आणि इमिग्रेशन अधिकारांसह कोरोनावरील अहवालाचा मोठा डेटा आहे. चीन सरकार या वेबसाइटवर करडी नजर ठेऊन आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही वेबसाइट कोरोनाबाबत चीन सरकारचा उघडं पाडण्याचं काम करत आहे. आता चीनी प्रशासन वेबसाईट चालकांच्या कुटुंबीयांना सतत त्रास देत आहे. महिला पत्रकार को पहुंचाया सलाखों के पीछे महिला पत्रकार झांग झान हिलाही कोरोनाबाबत वार्तांकन केल्याबद्दल 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वाद, भांडणे आणि अडचणी निर्माण करणे, असा गुन्हा त्यांच्यावर लावण्यात आला आहे. जेव्हा कोरोना शिगेला पोहोचला होता तेव्हा झांगने वुहानमधील अनेक रुग्णालयांना भेट दिल्याची माहिती दिली. यासोबतच तिने कोरोनामुळे स्थानिक प्रशासनाकडून तुरुंगात टाकलेल्या पत्रकारांच्या अटकेविरोधातही वार्तांकन केलं. 37 वर्षीय झांग व्यवसायाने वकील असून शांघायची रहिवासी आहे. फेब्रुवारी 2020 वुहानमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरल्यानंतर ती तिथं गेली होती. चीनच्या या भागात सतत स्मशानभूमी सुरू असल्याचं सॅटेलाइट फोटोंवरून समोर येत होतं. मात्र, खुद्द चीनने असा कोणताही खुलासा केलेला नाही. एक-दोन नव्हे, या महाशयांनी घेतले कोरोना लसीचे तब्बल 11 डोस; यंत्रणेत मोठी खळबळ माध्यम संस्था बंद होत आहेत माध्यम स्वातंत्र्यावर चीनची दडपशाही सतत कायम आहे. हाँगकाँगमधील सिटीझन न्यूज नावाचे आणखी एक मीडिया हाऊस सोमवारी बंद करण्यात आलं. त्यांना सुरक्षित वाटत नसल्याचे या ग्रुपचे मालक व पत्रकार सांगतात. वास्तविक, सिटिझन न्यूज बंद करण्याचा निर्णय अन्य एका मीडिया हाऊसच्या पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर घेण्यात आला आहे. सिटीझन न्यूज ही हाँगकाँगमधील सर्वात लोकप्रिय वेबसाइट आहे. सोशल मीडियावर त्याचे सुमारे आठ लाख फॉलोअर्स आहेत. सिटीझन न्यूज ही तिसरी मीडिया कंपनी आहे, जिने अलीकडेच आपले कामकाज बंद केले आहे. खरंतर हाँगकाँगच्या मीडिया हाऊसवर चीनच्या हुकूमशाही सरकारचा सतत दबाव असतो. पत्रकारांवर विनाकारण कारवाई केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या