मराठी बातम्या /बातम्या /देश /एक-दोन नव्हे, या महाशयांनी घेतले कोरोना लसीचे तब्बल 11 डोस; कारण ऐकून यंत्रणेत मोठी खळबळ

एक-दोन नव्हे, या महाशयांनी घेतले कोरोना लसीचे तब्बल 11 डोस; कारण ऐकून यंत्रणेत मोठी खळबळ

एका व्यक्तीनं कोरोना प्रतिबंधक लसीचे तब्बल 11 डोस घेतले, मात्र कुणाला त्याचा थांगपत्ताही लागला नाही.

एका व्यक्तीनं कोरोना प्रतिबंधक लसीचे तब्बल 11 डोस घेतले, मात्र कुणाला त्याचा थांगपत्ताही लागला नाही.

एका व्यक्तीनं कोरोना प्रतिबंधक लसीचे तब्बल 11 डोस घेतले, मात्र कुणाला त्याचा थांगपत्ताही लागला नाही.

पटना, 4 जानेवारी: बिहारमधील (Bihar) एक ज्येष्ठ नागरिकाने (Senior citizen) कोरोना प्रतिबंधक लसीचे (Covid vaccine) एक-दोन नव्हे तर तब्बल 11 डोस (11 doses) घेतल्याचं समोर आलं आहे. त्या व्यक्तीनं स्वतःच हा दावा केला असून एवढे डोस घेण्याचा आपल्याला काय फायदा झाला, हेदेखील जाहीरपणे सांगितलं आहे. प्रत्येकाने संधी मिळेल तेव्हा हे डोस घेत राहावेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात राहणाऱ्या ब्रह्मदेव मंडल या 84 वर्षांच्या व्यक्तीनं दावा केला आहे की त्यांनी आतापर्यंत 11 वेळा कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतले. प्रत्येक डोसनंतर आपली तब्येत सुधारत गेल्याचा दावाही त्यांनी केला असून लोक विनाकारण लसींवर टीका करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा आपण कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली असून त्याची वेळ, तारीख आणि इतर तपशीलही आपल्या डायरीत नोंदवून ठेवले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

यंत्रणेत उडाली खळबळ

कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आधार कार्डचा उपयोग करण्यात येतो. कुठल्याही आधार कार्ड नंबरवर त्या व्यक्तीनं घेतलेली कोरोनाची लस आणि इतर तपशील उपलब्ध असतात. अशा परिस्थितीत या व्यक्तीला 11 वेळा लस मिळालीच कशी, असा सवाल उपलब्ध झाला आहे. यावर यंत्रणेकडून काही स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे.

यंत्रणेचं स्पष्टीकरण

अनेकदा खुल्या शिबिरांमध्ये लसीकरण मोहिम राबवण्यात येते. त्यावेळी लस घेतलेल्या नागरिकांचा आधार कार्ड नंबर नोंदवून घेण्यात येतो आणि नंतर तो सिस्टिमला अपलोड करण्यात येतो. त्यामुळे अनेकदा लस घेणाऱ्या व्यक्तीचे तपशील यंत्रणेत स्विकारले जात नाहीत, मात्र प्रत्यक्षात त्या व्यक्तीनं लस घेतलेली असते. अशा प्रकारांमुळेच एखादी व्यक्ती अनेकदा लस घेऊ शकत असल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचा- अर्थसंकल्पासंबंधी देश स्वतंत्र झाल्यापासून ते आजवरच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी

‘न्यूज 18 लोकमत’ या दाव्याची पुष्टी करत नाही. मात्र जर खरोखरच एका व्यक्तीनं कोरोना प्रतिबंधक लसीचे 11 डोस घेतले असतील, तर ही गंभीर बाब आहे. आरोग्य विभाग आता यावर काय कारवाई करणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

First published:

Tags: Bihar, Corona, Corona vaccination