मुंबई, 21 मे: तौत्के चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याला चाटून गेलं तेव्हा समुद्रात अक्षरशः थैमान झालं. अलिबागजवळ नांगरलेलं एक जहाज या जीवघेण्या वाऱ्याने नांगर सुटून भरकटलं. अक्षरशः समोर मृत्यू दिसत असतानाच वाऱ्याने अचानक दिशा बदलली, वेळेत मदत मिळाली म्हणून बार्जवचे 137 जण वाचले. त्यापैकीच एक अंबरनाथचे देवाशीष शेळके यांनी सांगितलेला थरारक अनुभव