भोपाळ, 9 जानेवारी : देशभरात ओमायक्रॉन (Omicron) वैरियंटमुळे आलेल्या कोरोनाच्या (CoronaVirus) तिसऱ्या लाटेमुळे खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. यादरम्यान मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एक हैराण करणारी घटना समोर आली आहे, येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आपल्या मित्रांसह दारू पार्टी करीत होता. ना त्याला याची भीती होती आणि नाही त्याच्या मित्रांना. ते सर्वजण एका मागून एक प्याले रिचवत होते. जेव्हा प्रशासनाची टीम त्याच्या घरी पोहोचली तेव्हा तर हा रुग्ण हवेतच होता. ही लज्जास्पद घटना नयागाव जिल्ह्यातील आहे. येथे कंटेन्मेंट केलेल्या घरात संक्रमित रुग्ण आपल्या मित्रांसह दारू पार्टी करीत होता. शेजारच्यांनी यास नकार दिला होता. मात्र त्याने ऐकलं नाही. यानंतर शेजारच्यांनी प्रशासनाला याबाबत सूचना दिली. यानंतर नायब तहसीलदार आपल्या टीमसह तरुणाच्या घरी पोहोचल्या. टीमने जेव्हा दार उघडलं तेव्हा आतील दृश्य पाहून ते हैराण झाले. कारण घरात दारू पार्टी रंगली होती. महासाथीची चिंता न करता तो मित्रांसह दारू पित बसला होता. यादरम्यान पोलिसांनी रुग्णासह मित्रांनाही पकडलं. मात्र त्यांचा एक मित्र मागल्या दाराने फरार झाला. रुग्णाचं कृत्य समोर येताच माफी मागू लागला. मी पित नव्हतो, मी शेजारी बसलो होतो आणि मित्र पित होते. यात माझी काही चूक नाही. यानंतर पोलिसांनी रुग्णाला आयसोलेशन वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. हे ही वाचा- कापडी मास्क वापर असाल तर सावधान! संशोधकांनी दिली धोक्याची घंटा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल.. सोशल मीडियावर संक्रमित रुग्ण आणि त्याच्या मित्रांचा दारू पार्टीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. संक्रमित रुग्णाचे मित्र एक्सिस बँकेचे कर्मचारी असल्याचं सांगितलं जात आहे. मित्र कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं त्यांना आधीच माहिती होतं. मात्र तरीही ते त्याच्यासोबत एकत्रित पार्टी करीत होते.