JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / सर्दी, व्हायरल तापाची लक्षणं दिसली तरी Corona test करावी का? आणि कधी?; काय सांगतात तज्ज्ञ पाहा

सर्दी, व्हायरल तापाची लक्षणं दिसली तरी Corona test करावी का? आणि कधी?; काय सांगतात तज्ज्ञ पाहा

तज्ज्ञांच्या मते आता सर्दीच्या विषाणूपेक्षा कोरोनाचे विषाणू जास्त आहेत.

जाहिरात

मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक रोगांना बळी पडण्यापासून वाचवण्यास मदत करते. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आवळ्याचा रस पिऊ शकता.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जानेवारी : कोरोनाव्हायरसची (Coronavirus) दहशत अद्यापही संपलेली नाही. उलट नवनवे व्हेरिएंट (Corona variant) समोर येत आहेत. त्याची लक्षणंही (Corona symptoms) वेगवेगळी आहेत. पण सामान्यपणे सर्दी-ताप-खोकला अशी लक्षणं दिसली तरी मला कोरोना तर झाला नाही, अशीच शंका मनात येते. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरही आपल्याला व्हायरल ताप असल्याचं सांगतात. अशात कोरोना टेस्ट (Corona test guidelines) करावी की नाही आणि हो तर कधी करावी? असा प्रश्न साहजिकच पडतो. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कोरोना चाचणीबाबत नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. कुणी कोरोना चाचणी करावी आणि कुणी नाही याबाबत इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) यादी जारी केली आहे. त्यामध्ये अगदी कोरोनाचा जास्त धोका नसलेल्या आणि कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचीही चाचणी करू नये, असं सांगण्यात आलं आहे. मग डॉक्टरांनी सर्दी किंवा व्हायरल ताप सांगितला पण आपल्याला कोरोना झाल्याची शंका वाटत असेल तर कोरोना टेस्ट करावी की नाही? याबाबत आयएमए महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं, “आता सर्दीच्या विषाणूपेक्षा कोरोनाचे विषाणू जास्त आहेत. त्यामुळे सर्दी, ताप खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणं यापैकी कुठलीही दोन लक्षणं असली तरी तुम्ही कोरोना टेस्ट करूनच घ्याल.  लक्षणं जाणवतील त्याच दिवशी किंवा फार फार तर दुसऱ्या दिवशी टेस्ट करावी. यावेळी तुम्ही कोरोना टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह येईल त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात उशीर करू नका. शिवाय आरटी आरटी-पीसीआर टेस्टच करा. घरच्या घरी टेस्ट करू नका” हे वाचा -  कोरोना काळात Doloची भरमसाठ विक्री;खपलेल्या गोळ्या एकत्र केल्यास बनेल बुर्ज खलिफा ICMR च्या गाईडलाइन्सनुसार कुणी कोरोना चाचणी करावी 1) ज्यांना खोकला, ताप, घशात खवखव आहे आणि चव लागत नाही. 2) कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेले 60 पेक्षा जास्त वयाचे लोक 3) कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेले आणि गंभीर आजार असलेले लोक 4) परदेशाहून परतलेले नागरिक 5) भारतात येणारे परदेशी नागरिक 6) ज्यांना डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. हे वाचा -  काय म्हणावं याला! म्हणे, ‘मला हवी कोरोना पॉझिटिव्ह तरुणी’, पैसे देण्याचीही तयारी ICMR च्या गाईडलाइन्सनुसार कुणाला कोरोना चाचणीची गरज नाही? 1) कोरोना लक्षणं नसलेले लोक 2) कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले पण ज्यांना जास्त धोका नाही, म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे. आजारी नाहीत असे लोक 3) होम आयसोलेशनच्या गाइडलाइन्सनुसार डिस्चार्ज मिळालेले लोक 4) रुग्णालयाच्या डिस्चार्ज पॉलिसीनुसार कोरोनातून बरे होऊन डिस्चार्ज मिळालेले लोक 5) देशांतर्गत प्रवास करणारे नागरिक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या