JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनाचा नवीन प्रकार Deltacron किती धोकादायक? काय म्हणतायेत भारतीय शास्त्रज्ञ?

कोरोनाचा नवीन प्रकार Deltacron किती धोकादायक? काय म्हणतायेत भारतीय शास्त्रज्ञ?

NTAGI च्या कोविड वर्किंग ग्रुपचे सदस्य आणि प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप कांग (Dr. Gagandeep Kang) यांनी म्हटले आहे की, यूकेमध्ये आढळलेला विषाणू डेल्टाक्रॉन (Deltacron) आहे की आणखी काही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. क्लिनिकल तपासणी, प्रसारक्षमता, महामारीचा डेटा पाहिल्यानंतरच आपण ते किती गंभीर आहे हे सांगू शकू.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बेंगळुरू, 20 फेब्रुवारी : कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) कहराचा सामना करत असलेल्या जगामध्ये कोविड-19 च्या नवीन डेल्टाक्रॉन प्रकाराने नवीन दहशत पसरवली आहे. प्राणघातक डेल्टा (Delta) आणि अतिशय वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन (Omicron) प्रकारापासून विकसित झालेल्या या विषाणूची काही प्रकरणे ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळून आली आहेत. त्यांची संख्या खूपच कमी आहे. पण शास्त्रज्ञ सावध झाले आहेत. भारतीय शास्त्रज्ञही त्यावर लक्ष ठेवून आहेत. घाबरण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतात आतापर्यंत डेल्टाक्रोनचा एकही रुग्ण आढळलेला नाही. न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भारतातील प्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या विविध प्रकारापासून विकसित झालेला नवीन विषाणू आणि म्युटंट व्हायरसमध्ये फरक आहे. म्युटेशन म्हणजे परिस्थितीमुळे विषाणूच्या आत होणारे बदल. तर तथाकथित डेल्टाक्रोनचे वर्णन वेगवेगळ्या विषाणूंच्या मिश्रणाने बनलेला नवीन विषाणू असे केले जात आहे. याबाबत आत्ताच आम्ही निश्चितपणे काही सांगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला त्याची क्लिनिकल तपासणी करावी लागेल, त्याची पसरण्याची क्षमता तपासावी लागेल, महामारीचा डेटा पाहावा लागेल. तरच याबाबत ठोस काही सांगता येईल. कोरोना संसर्ग दीर्घ काळ राहिल्यास गंभीर धोका, Heart Beat वर होऊ शकतो मोठा परिणाम आत्ताच सांगणे कठीण : डॉ. कांग भारतातील कोरोना लसीकरणासाठी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट NTAGI च्या कोविड वर्किंग ग्रुपचे सदस्य, डॉ. कांग म्हणाले की, तो डेल्टाक्रोन आहे की अन्य कोणता विषाणू हे अद्याप निश्चितपणे सांगता येत नाही. हे सांगण्यासाठी पुरेशी प्रकरणे असणे आवश्यक आहे. त्यानंतरच ते किती गंभीर आहे, ते शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला कसे फसवू शकते आणि त्याचा प्रसार होण्याची क्षमता किती आहे हे सांगता येईल. व्हेरिएंट अंडर इन्व्हेस्टिगेशन डेल्टाक्रोनचा शोध सर्वप्रथम ब्रिटनमध्ये लागला. तेथे एका व्यक्तीला एकाच वेळी डेल्टा आणि ओमिक्रॉन प्रकारांचा त्रास होत होता. तिथेच पहिल्यांदा पाहिलं होतं. परंतु, हा विषाणू यूकेमध्येच तयार झाला की बाहेरून तेथे पोहोचला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतात SARS covid-2 Genome Associated Consortium in India (INSACOG) चे नोडल ऑफिसर डॉ. व्ही. रवी यांनी द न्यू इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, यूकेने त्याला सध्या ‘व्हेरिएंट अंडर इन्व्हेस्टिगेशन’ श्रेणीमध्ये ठेवले आहे. तेथील अधिकारी असेही म्हणतात की हा संसर्ग किती गंभीर आहे आणि त्याचा सध्याच्या लसीच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो की नाही हे त्यांना अद्याप माहित नाही. INSACOG चीही यावर पूर्ण नजर आहे. पण आता घाबरण्याची गरज नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या