JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Big News: इटलीतून भारतात आला कोरोनाचा ‘व्हायरल बॉम्ब’, एकाच विमानानं आलेले 125 प्रवासी Positive

Big News: इटलीतून भारतात आला कोरोनाचा ‘व्हायरल बॉम्ब’, एकाच विमानानं आलेले 125 प्रवासी Positive

इटलीहून भारतात आलेल्या एकाच विमानात तब्बल 125 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमृतसर, 6 जानेवारी: इटलीहून (Italy) भारतात (India) आलेल्या विमानात (Flight) तब्बल 125 प्रवासी (125 passengers) कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) असल्याचं दिसून आलं आहे. ही बाब अत्यंत धक्कादायक असून भारतात आलेल्या या सर्व प्रवाशांना विमानतळावरच आयसोलेट करण्यात आलं आहे. एकाच विमाातून हे सर्व प्रवासी भारतात आल्याची माहिती आहे. एकाच विमानात एवढ्या प्रचंड संख्येनं प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाचा बॉम्ब इटलीहून भारतात आलेल्या या विमानात एकूण 179 प्रवासी होते. अमृतसरमध्ये विमान उतरल्यानंतर त्या सर्वांची कोरोना चाचणी कऱण्यात आली. या चाचणीमध्ये 179 पैकी 125 प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं आढळून आलं. त्यामुळं यंत्रणा खडबडून जागी झाली असून सर्व प्रवाशांना तातडीनं क्वारंटाईन करण्यात आलं आहे. विमान कुठल्या कंपनीचं? सुरुवातील इटलीहून अमृतसरला आलेलं हे विमान ‘एअर इंडिया’ कंपनीचं असावं, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र एअर इंडियाकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे. आपलं एकही विमानत सध्या इटलीला जात नसल्याचं स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलं आहे. टेस्ट का केली नाही? विमानात बसताना प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी करण्यात येते. जर चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह नसेल, तरच प्रवाशाला विमाानाने प्रवास करता येतो. भारताप्रमाणे जगातील बहुतांश देशांमध्ये हाच नियम असताना कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एवढ्या रुग्णांना विमानात बसण्याची परवानगीच कशी देण्यात आली, असा सवाल यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून भारताच्या चिंतेतही त्यामुळं भर पडली आहे. हे वाचा- कोरोनाचं थैमान, Lockdown बाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी केलं महत्त्वाचं विधान भारतात कोरोनाचा उद्रेक गेल्या काही आठवड्यांमध्ये भारतातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याचं आढळून आलं आहे. त्याखोलाखाल पश्चिम बंगाल, दिल्ली, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांचा नंबर लागतो. अशातच पंजाबमध्ये आलेल्या या ‘कोरोनाबाधित’ विमानामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाचे निकष पाळले जाण्याबाबत काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या