नवी दिल्ली, 4 मे : प्रशासकीय सेवेत दाखल व्हायचं स्वप्न बाळगून देशभरातले लक्षावधी विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देतात. IAS, IPS ऑफिसर होण्याची पहिली पायरी असलेली UPSC Prelims Exam 2020 या वर्षी Coronavirus च्या संकटामुळे पुढे ढकलली आहे. 31 मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली जाण्याची चर्चा होतीच. लोकसेवा आयोगाने सोमवारी जाहीरपणे ही परीक्षा पुढे ढकलली असल्याचं जाहीर केलं.
UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अरविंद सक्सेना यांच्या उपस्थितीत परीक्षांच्या तारखेबद्दल सोमवारी बैठक झाली. त्या वेळी 31 मे रोजी घेतली जाणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. COVID-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच पुढची तारीख ठरवण्यात येईल, असं UPSC तर्फे सांगण्यात आलं. या कारणांमुळे मुंबईत वाढत आहे कोरोना बाधितांची संख्या, आरोग्यमंत्र्यांचा खुलासा देशव्यापी वॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढल्याने आणि अजूनही विषाणूचा फैलाव आटोक्यात न आल्याने परीक्षा घेण्यासारखं वातावरण नाही. आता 20 मे नंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यानंतरच लेखी परीक्षेचं आयोजन केली जाईल. ही परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल का याबाबतही चर्चा होती. पण UPSC ने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पूर्वपरीक्षेबाबतचा निर्णय 20 मे नंतर घेण्यात येईल. अन्य बातम्या विधान परिषदेसाठी सेनेची मोर्चेबांधणी, उद्धव ठाकरेंसह ‘हे’ नाव निश्चित शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी Lockdownमुळे एकही भाविक नाही, पण देणगीचा ओघ सुरूच एकेकाळी रस्त्यावर विकायचा बांगड्या…जिद्दीच्या जोरावर आज आहे IAS ऑफिसर