जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी Lockdownमुळे एकही भाविक नाही, पण देणगीचा आकडा ऐकाल तर व्हाल थक्क!

शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी Lockdownमुळे एकही भाविक नाही, पण देणगीचा आकडा ऐकाल तर व्हाल थक्क!

शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी Lockdownमुळे एकही भाविक नाही, पण देणगीचा आकडा ऐकाल तर व्हाल थक्क!

कोरोनामुळे भाविकांना बाबांच्या दर्शनासाठी येता येत नाही. मात्र दर्शनाची ती भूक ऑनलाईन भागवून तेवढच भरभररून दान ते देत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

शिर्डी 04 मे: देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे सगळा व्यवहारच बंद आहे. देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत देवस्थान असेलं शिर्डी बंद आहे. इतिहासात पहिल्यांदाच बाबांचं दर्शन बंद आहे. फक्त पुजारी दैनंदिन होत असलेल्या पुजा आणि उतर उपचार पार पाडत आहेत. गेल्या 48 दिवसांपासून मंदिर बंद आहे. दर्शनासाठी एक माणूसही आलेला नाही. पण तरीही बाबांच्या झोळीत जवळपास दीड महिन्यांमध्ये 2 कोटी 53 लाखांचं दान जमा झालं आहे. माणसांच्या श्रद्धेला आणि भक्तिला कशाचीच उपमा देत येत नाही. गेल्या 17 मार्च पासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यानंतर संस्थानने ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली होती. बाबांचं ऑनलाईन दर्शन घेऊन भाविक ऑनलाईन दानही भरभरून देत आहेत. याच माध्यमातून हे अडीच कोटींचं दान संस्थानकडे जमा झालं आहे. जगभरातून भाविक शिर्डीत दर्शनासाठी येत असतात आणि मंदिराच्या दानपेटील कोट्यवधींचं दान येत असतं. जगभरातून येणारे लोक हे त्यांच्या त्यांच्या चलनातही दान देत असतात त्यामुळे दान पेटीत डॉलर पासून ते दिनारपर्यंत सगळं चलन येत असतं. त्यातून संस्थान अनेक लोकोपयोगी उपक्रमही चालवतं. हे वाचाया कारणांमुळे मुंबईत वाढत आहे कोरोना बाधितांची संख्या, आरोग्यमंत्र्यांचा खुलासा ऑनलाईन देणगीची सुविधा झाल्यापासून लोक थेट पेैसे खात्यात जमा करतात. त्याचा आकडाही मोठा आहे. कोरोनामुळे भाविकांना बाबांच्या दर्शनासाठी येता येत नाही. मात्र दर्शनाची ती भूक ऑनलाईन भागवून तेवढच भरभररून दान ते देत आहे. हे वाचा-  फेसबुक युजरसाठी मोठी बातमी, आता VIDEO पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे बाबांनी शिर्डीला त्याकाळात प्लेगच्या साथीपासून वाचवलं अशी श्रद्धा आहे. गावाच्या सीमेवर पीठाची रांगोळी काढत बाबांनी लोकांना वाचवलं अशी अख्यायिका आहे. त्यामुळे कोरोना प्रसार झाल्यानंतर ग्रामस्थांनी शिर्डी गावाभोवती पीठाची रांगोळी काढली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात