UIDAI
मुंबई, 31 मार्च : सरकारी नोकरीमध्ये चांगला अनुभव असेल व वरच्या पदावर नियुक्तीची अपेक्षा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ‘युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया’मध्ये (UIDAI) सहायक महासंचालक (तंत्रज्ञान) या पदासाठी एका जागेवर प्रतिनियुक्ती (फॉरीन सर्व्हिस टर्म बेसिस) होणार आहे. बेंगळुरूच्या टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये ही भरती केली जाणार आहे. UIDAIने जाहिरातीद्वारे भरतीची अधिसूचना काढली आहे. UIDAIमधल्या सहाय्यक महासंचालक या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे ई-मेलद्वारे उमेदवार अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांचे अर्ज केडर कंट्रोलिंग ऑथोरिटी व विभाग प्रमुखांकडून 29 मेपर्यंत पुढे पाठवले जातील. UIDAI च्या बेंगळुरू इथल्या टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये ही प्रतिनियुक्ती केली जाईल. या पदासाठी जास्तीत जास्त 56 वर्षं ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसंच सहायक महासंचालक या पदासाठी पे लेव्हल 12 ही असेल. हेही वाचा - सरकारी नोकरीची सर्वात मोठी सुवर्णसंधी; पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी बंपर ओपनिंग्स
पात्रता
केंद्र सरकारी संस्थेत 4 वर्षांच्या नियमित सेवेसह पेरेंट केडर किंवा विभागात समान पद असलेले अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतात. राज्य सरकारी, सार्जनिक क्षेत्रातल्या किंवा स्वायत्त संस्थेत याच स्तरावरच्या पदावर काम करणारे व अपेक्षित अनुभव असलेले अधिकारीही या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांकडे इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमधली 4 वर्षांची पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतली मास्टर इन कम्प्युटर अॅप्लिकेशन्स ही पदवी असावी. निवड प्रक्रिया या पदासाठी प्रतिनियुक्तीद्वारे पदभरती केली जाणार आहे. ही नियुक्ती 5 वर्षांसाठी असेल; मात्र ज्या विभागातून संबंधित कर्मचाऱ्याची निवड होईल, तो विभाग संबंधित कर्मचाऱ्याला आपल्या नियमांनुसार पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीही प्रतिनियुक्तीवर पाठवू शकतो; मात्र तो कालावधी 3 वर्षांपेक्षा कमी नसावा. इतर सामान्य अटी व शर्ती UIDAIच्या नियमावली 2020नुसार, तसंच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असतील. UIDAIच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबतची अधिक माहिती जाणून घेता येईल. हेही वाचा - SCI Recruitment: सुप्रीम कोर्टात तब्बल 1,23,100 रुपये पगाराची नोकरी; चान्स सोडूच नका; अवघे काही दिवस शिल्लक वेतन आणि भत्त्यांसह प्रतिनियुक्तीच्या अटी कार्मिक व प्रशिक्षण कार्यालयाद्वारे नियंत्रित केल्या जातील. यात रजेबाबतच्या अटी नसतील. UIDAIच्या रजेबाबतच्या नियमांनुसार प्रतिनियुक्त अधिकाऱ्याची रजा मंजूर केली जाईल. अर्ज कसा करावा? सांगितलेल्या प्रक्रियेनुसार उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना अॅडव्हान्स अॅप्लिकेशन 15 मे 2023पर्यंत करता येतील. आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण केलेले अर्ज विभागप्रमुख किंवा केडर कंट्रोलिंग ऑथोरिटी 29 मेपर्यंत पुढे पाठवतील. ज्या उमेदवारांना निवडीनंतर तत्काळ प्रतिनियुक्तीवर जाता येईल अशा इच्छुक व पात्र उमेदवारांचे अर्ज UIDAIच्या नवी दिल्ली इथल्या मुख्यालयात पाठवले जातील. पात्र उमेदवारांनी त्यांच्या अर्जासोबत आधीच्या 5 वर्षांच्या वार्षिक कामकाज अहवाल किंवा वार्षिक कामकाज मूल्यांकन अहवालाच्या प्रती जोडाव्यात.