मुंबई, 28 मार्च: ‘पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ हा केंद्र सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित हा उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत भारतातील विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा करण्याचं काम केलं जातं. पॉवर ग्रिड भारतात निर्माण होणाऱ्या एकूण विजेपैकी 50 टक्के वीज आपल्या ट्रान्समिशन नेटवर्कद्वारे प्रसारित करते. आपल्या विस्तीर्ण कामाचा पसारा व्यवस्थित सांभाळण्यासाठी पॉवर ग्रिड कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गरज भासते. आताही कंपनीनं गेट 2023 च्या माध्यमातून इंजिनीअर ट्रेनी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागितले आहेत. पॉवर ग्रिड 2023 भरतीच्या अधिसूचनेनुसार, इंजिनीअर ट्रेनी पदांसाठी एकूण 138 जागा रिक्त आहेत. वर नमूद केलेल्या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 500 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. ‘स्टडी कॅफे’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पॉवर ग्रिड 2023 भरतीच्या अधिसूचनेनुसार, इंजिनीअर ट्रेनी पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 28 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरून अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. इतर कोणत्याही स्वरुपातील अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2023 आहे. IAS Tips: UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द IAS विकास दिव्यकीर्ती यांनी दिल्या टिप्स पोस्टचं नाव आणि संख्या: इलेक्ट्रिकल विभागासाठी 83, सिव्हिल विभागासाठी 20, इलेक्ट्रॉनिक विभागासाठी 20 आणि कॉम्प्युटर सायन्स विभागासाठी 15 इंजिनीअर ट्रेनींची आवश्यकता आहे. पात्रता: इंजिनीअर ट्रेनी पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून पूर्णवेळ B.E./ B.Tech / B.Sc (Engg.) डिग्री घेतलेली असणं आवश्यक आहे. 1. इलेक्ट्रिकल: इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टिम इंजिनिअरिंग/ पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) या पैकी एक डिग्री आवश्यक. JOB ALERT: महिन्याचा तब्बल 75,000 रुपये पगार आणि कोणतीही परीक्षा नाही; इथे थेट मुलाखतीला राहा हजर 2. इलेक्ट्रॉनिक्स: इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन / टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग या पैकी एक डिग्री आवश्यक. 3. सिव्हिल: सिव्हिल इंजिनीअरिंग Google Apprenticeship Program: गुगलमध्ये ‘या’ क्षेत्रातील ग्रॅज्युएट्ससाठी जॉबची मोठी संधी; बघा संपूर्ण डिटेल्स 4. कॉम्प्युटर सायन्स: कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग / आयटी यापैकी एक डिग्री आवश्यक. वयोमर्यादा: इंजिनीअर ट्रेनी पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेला उमेदवार 28 वर्षांपेक्षा कमी वयाचा असावा. अर्ज करण्याची फी: इंजिनीअर ट्रेनी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 500 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.
अर्ज कसा करावा: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करणं अपेक्षित आहे. इतर कोणत्याही स्वरुपातील अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2023 आहे.