UGC NET 2023
मुंबई, 21 मार्च: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच UGC NET 2023 चा निकाल जाहीर करू शकते. या परीक्षेला बसलेले उमेदवार निकाल जाहीर झाल्यानंतर UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. UGC NET परीक्षा पाच टप्प्यात घेण्यात आली आणि 15 मार्च 2023 रोजी संपली. UGC NET निकालासोबत NTA, UGC NET Answer Key आणि UGC NET कट-ऑफ मार्क्स देखील जारी करेल. JOB ALERT: मुंबईत 10वी, 12वी पाससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी; या पत्त्यावर लगेच करा अप्लाय याशिवाय, उमेदवार https://ugcnet.nta.nic.in/ या लिंकवर क्लिक करून UGC NET निकाल 2023 थेट पाहू शकतात. तसेच, खाली दिलेल्या या चरणांद्वारे तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. UGC NET निकाल 2023 मध्ये उमेदवाराचे गुण, रँक आणि इतर संबंधित तपशील असतील. UGC NET परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार भारतभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) पदांसाठी पात्र असतील. Career Tips: करिअरमध्ये सतत पुढे जायचंय ना? मग अशा पद्धतीनं वाढवा लीडरशिप स्किल्स; या घ्या टिप्स UGC NET 2023 ची परीक्षा देशभरातील अनेक केंद्रांवर यशस्वीपणे पार पडली. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (UGC NET) चा UGC NET निकाल लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल. UGC NET 2023 परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 15 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली.
असा चेक करा निकाल UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर भेट द्या. होमपेजवर NTA UGC NET निकाल 2023 लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा. स्क्रीनवर एक नवीन लॉगिन पृष्ठ दिसेल. लॉग इन करण्यासाठी सर्व आवश्यक तपशील जसे की रोल नंबर, जन्मतारीख किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा. तुमचा UGC NET निकाल 2023 स्क्रीनवर दिसेल. UGC NET निकाल 2023 तपासा आणि सेव्ह करा.