JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Success Story: शाब्बास! UPSC मध्ये तब्बल आठवेळा झाला नापास, पण हरला नाही हिंमत, अखेर झाला IAS

Success Story: शाब्बास! UPSC मध्ये तब्बल आठवेळा झाला नापास, पण हरला नाही हिंमत, अखेर झाला IAS

IAS Success Story: वैभव छाबडा याला एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल आठ वेळा अपयश आलं, पण हिंमत न हारता त्याने परीक्षेची तयारी सुरूच ठेवली, अखेर यूपीएससीमध्ये यश मिळवत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.

जाहिरात

Success Story: शाब्बास! UPSC मध्ये तब्बल आठवेळा झाला नापास, पण हरला नाही हिंमत, अखेर झाला IAS

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 ऑगस्ट: केंद्रीय लोकसेवा आयोगाची यूपीएससी (UPSC) आणि राज्य लोकसेवा आयोगाची एमपीएससी (MPSC), अशा स्पर्धा परीक्षांची (competitive exams) तयारी दरवर्षी लाखो विद्यार्थी करत असतात; पण एक-दोनदा अपयश आल्यानंतर अनेकजण या परीक्षेची तयारी करणं सोडून देतात. मात्र, देशातील सर्वांत कठीण जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत एका विद्यार्थ्याला एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल आठ वेळा अपयश आलं, पण त्याने हिंमत न हारता परीक्षेची तयारी सुरूच ठेवली अखेर यूपीएससीमध्ये यश मिळवत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवलाय. ती व्यक्ती म्हणजे वैभव छाबडा (Vaibhav Chhabada). यूपीएससी ही देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक आहे, आणि त्यात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाबरोबरच संयम असणं अत्यंत आवश्यक आहे. असे अनेक विद्यार्थी आहेत जे या परीक्षेत नापास झाल्यावर निराश होऊन तयारी सोडून देतात. मात्र, वैभव छाबडा यांनी या परीक्षेत तब्बल आठ वेळा अपयश आल्यानंतरही हिंमतीने अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर 2018 मध्ये या परीक्षेत 32 वा क्रमांक मिळवला. दिल्लीत राहणारे वैभव एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. ते सांगतात, ‘मी सुरुवातीचं शिक्षण दिल्लीतून पूर्ण केलं होतं. पण मला अभ्यासात अजिबात रस नव्हता. सुरुवातीपासून मी बॅकबेंचर विद्यार्थी होतो. मला बीटेक पूर्ण करण्यासाठी 5 वर्षं लागली, व मला केवळ 56 टक्के गुण मिळाले होते.’ हेही वाचा-  Best Parenting Apps: मुलांच्या संगोपनाची चिंता सतावतीये? ही 5 पॅरेंटिंग अ‍ॅप ठरतील उपयुक्त बीटेक पूर्ण केल्यानंतर वैभव यांनी एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये फिजिक्स विषयाचे शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली. या वेळी त्यांच्या मनात पहिल्यांदाच यूपीएससीची परीक्षा देण्याचा विचार आला, आणि शिक्षकाची नोकरी सोडून त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. यूपीएससीची तयारी करताना त्यांना तब्बल 8 वेळा अपयश आलं; पण त्यांनी हिंमत सोडली नाही. याच काळात, त्यांचा अपघात झाला, व त्यात पाठीला दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्ट सांगितली होती. या कठीण काळातही त्यांनी अभ्यास थांबवला नाही. अखेर वैभव यांच्या कष्टाला यश आलं, व ते 2018 मध्ये यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाले. या यशानंतर वैभव म्हणतात, ‘तुमचं मनोधैर्य कधीही खचू देऊ नका आणि ध्येय मिळवण्यासाठी लढत राहा.’ वैभव छाबडा यांनी दिलेला हा सल्ला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी खूपच मोलाचा आहे. देशामध्ये सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. काही जण परीक्षेत पास होतात तर काहींना अपयश येतं. अशातच वैभव छाबडा यांनी या परीक्षेत मिळवलेलं यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या