जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Best Parenting Apps: मुलांच्या संगोपनाची चिंता सतावतीये? ही 5 पॅरेंटिंग अ‍ॅप ठरतील उपयुक्त

Best Parenting Apps: मुलांच्या संगोपनाची चिंता सतावतीये? ही 5 पॅरेंटिंग अ‍ॅप ठरतील उपयुक्त

Best Parenting Apps: मुलांच्या संगोपनाची चिंता सतावतीये? ही 5 पॅरेंटिंग अ‍ॅप ठरतील उपयुक्त

Best Parenting Apps: मुलांच्या संगोपनाची चिंता सतावतीये? ही 5 पॅरेंटिंग अ‍ॅप ठरतील उपयुक्त

Best Parenting Apps: तुम्हीदेखील तुमच्या मुलांसाठी चिंतित असाल, तर तुम्ही ही पॅरेंटींग अ‍ॅप डाऊनलोड करू शकता. अशी अनेक अ‍ॅप तुम्हाला गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध होतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 ऑगस्ट: अलीकडच्या काळात लोकांमागे कामाचा व्याप इतका वाढलाय की, त्यांना स्वतःसाठी तसेच आपल्या कुटुंबासाठी वेळच काढता येत नाही. पूर्वी स्त्रिया घरी राहून मुलांची काळजी घ्यायच्या आणि पुरुष उदरनिर्वाहासाठी काम करायचे. परंतु आता स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. साहजिकच आई आणि वडील दोघंही नोकरीला असल्यामुळं बाळांची काळजी घेण्याचं मोठं आव्हान असतं. त्यात अलीकडचं गतिमान जग, सतत येणारी रोगराई, शिक्षणाचं बदललेलं स्वरूप अशा सर्व गोष्टींमधून मुलांचा सांभाळ करताना मुलांच्या पालकांची कसोटी लागते. मुलांची कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी? त्यांना हवं नको ते कसं बघावं? त्यांच्यासाठी काय करावं? काय करू नये? असे अनेक प्रश्न पालकांना सतावत असतात. म्हणूनच पालक आपल्या मुलांच्या संगोपणासाठी काय करता येईल, याचा विचार करत असतात. अशावेळी पालकांना मदत होऊ शकते ती मुलांचं संगोपण कसं करावं हे सांगणाऱ्या मोबाईल अ‍ॅप्सची (Best Parenting Apps on Google Play Store)…मुलांशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टींची माहिती देणारी ही अ‍ॅप अनेक पालक सध्याच्या घडीला वापरत आहेत. तुम्हीदेखील तुमच्या मुलांसाठी चिंतित असाल, तर तुम्ही ही पॅरेंटींग अ‍ॅप डाऊनलोड करू शकता. अशी अनेक अ‍ॅप तुम्हाला गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध होतील. चला पाहूया काही खास अ‍ॅपची माहिती. 1. Healofy: महिलांनी प्रेग्नन्सीमध्ये कशी काळजी घ्यावी इथपासून ते मूल जन्मल्यावर त्याचं संगोपन कसं करावं, कोणती प्रॉडक्ट्स वापरावीत अशा अनेक गोष्टी तुम्हाला या अ‍ॅपमध्ये दिसतात. या अ‍ॅपला 4.6 स्टार्स रेटींग मिळालं असून 1 कोटींपेक्षा जास्त लोकांनी ते डाउनलोड केलं आहे. 2. Google family link: गुगलचं हे अ‍ॅप पालकांनी मुलांची कशी काळजी घ्यायला हवी, यासाठी मदत करू शकतं. या अपला 4.3 स्टार्स रेटींग मिळाले आहेत. तर 5 कोटींपेक्षा जास्त लोकांनी ते डाउनलोड केलं आहे. हेही वाचा:  ओटीपोटाच्या दुखण्यावर उत्तम आहेत हे घरगुती उपाय, वेदनेपासून मिळेल त्वरित आराम 3.The Happy Child parenting App: मुलांना आनंदी कसं ठेवावं, यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त आहे. या अ‍ॅपलाही 4.9 स्टार्स मिळाले आहेत, तर 5 लाखांहून अधिक लोकांनी त्याला डाउनलोड केलं आहे. 4. Growth chart, Development Milestones App: मुलांची वाढ होत असताना त्यांची कशी काळजी घ्यायला हवी, हे सांगणारे हे अ‍ॅप 1 लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केला आहे. 5. Famisafe-Screen time Control: मुलांच्या संगोपणाशी संबंधित हे अ‍ॅप 10 लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केलं आहे. या अ‍ॅपला 4.9 रेटींग मिळालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात