JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Success Story: प्रिंसिपलची मुलगी बनली IAS, मुलगा सैन्यदलात, उरी हल्ल्याने बदललं जीवन

Success Story: प्रिंसिपलची मुलगी बनली IAS, मुलगा सैन्यदलात, उरी हल्ल्याने बदललं जीवन

आयएएस होण्याचे स्वप्न पाहणे सोपे आहे पण इतकी अवघड परीक्षेचा विचार करुन ते स्वप्न पूर्ण करणे खूप अवघड आहे. पण अशक्य नक्कीच नाही.

जाहिरात

आयएएस दिव्या मिश्रा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : दरवर्षी लाखो उमेदवार UPSCची परीक्षा देतात. त्यांच्यापैकी काही जण यशस्वी होतात आणि स्वतःचा, त्यांच्या कुटुंबाचा आणि शहराचा नावलौकिक मिळवतात. आयएएस होण्याचे स्वप्न पाहणे सोपे आहे पण इतकी अवघड परीक्षेचा विचार करुन ते स्वप्न पूर्ण करणे खूप अवघड आहे. पण अशक्य नक्कीच नाही आणि उत्तर प्रदेशातील कानपूर येथे राहणाऱ्या दिव्या मिश्रा यांनी आयएएस होण्याचे आपले बालपणीचे स्वप्न पूर्ण केले आहे. आज जाणून घ्या, त्यांचा यशस्वी प्रवास. नवोदय स्कूलमधून शिक्षण - हनुमंत विहार, नौबस्ता, कानपूर, उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या दिव्या मिश्रा यांचे वडील दिनेश मिश्रा हे नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आहेत. तर त्यांच्या आई मंजू मिश्रा गृहिणी आहे. दिव्या यांचा धाकटा भाऊ दिव्यांशु मिश्रा लष्करात लेफ्टनंट म्हणून कार्यरत आहे. दिव्या यांनी त्यांचे शालेय शिक्षण नवोदय विद्यालय, उन्नाव येथून पूर्ण केले आहे. शिक्षणात तरबेज - दिव्या मिश्रा यांनी 10वी बोर्डाच्या परीक्षेत 96.6 टक्के गुणांसह राज्यात टॉप केले होते. यानंतर त्यांनी बारावीत 92.4 टक्के गुण मिळवले. त्यानंतर दिव्याने AKTU मधून B.Tech पूर्ण करून कांस्य पदकही पटकावले. त्यांनी पीएचडीही केली आहे. दिव्याने पदव्युत्तर शिक्षण घेऊन यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. हेही वाचा -  Success Story : 25 मिनिटे चालली मुलाखत, IAS कृति राज यांच्या या उत्तरावर बोर्ड मेंबरही हसले दिव्या मिश्रा यांना लहानपणापासूनच आयएएस व्हायचे होते. पण हा प्रवास त्यांच्यासाठी थोडा कठीण होता. पहिल्याच प्रयत्नात त्या फक्त 4 गुणांनी UPSC परीक्षा हुकल्या. तर दुसऱ्या प्रयत्नात त्यांना 312 व्या क्रमांकासह रेल्वे विभागात अधिकारी होण्याची संधी मिळाली. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. त्यानंतर 2020 मध्ये दिव्या मिश्रा यांनी 28 व्या रँकसह आयएएस होण्याचा मान मिळवला. लष्करावरील हल्ल्याने निर्णय बळकट - IAS दिव्या मिश्रा जेव्हा UPSC परीक्षेची तयारी करत होत्या, तेव्हा त्यांच्या धाकट्या भावाची सैन्यात लेफ्टनंट म्हणून निवड झाली. त्यामुळे त्यांच्यावर नोकरीचे दडपण वाढू लागले. पण त्यांनी काहीही आपल्यावर हावी होऊ दिले नाही. दरम्यान, उरी हल्ल्यानंतर त्यांच्या मनावर मोठा घाव केला. त्यानंतर त्यांनी दुप्पट मेहनत करुन तयारी सुरू केली आणि अखेर आयएएस पदाला गवसणी घातली. त्यांचा यशस्वी प्रवास हा स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या