NEET UG 2023
मुंबई, 07 मार्च: राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) 2023 साठी नोंदणी सुरू झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने रात्री उशिरा NEET UG 2023 साठी अर्ज जारी केले आहेत. NEET 2023 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना NTA च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्यावी लागेल. अर्जाचा फॉर्म केवळ अधिकृत वेबसाइटद्वारे भरला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचंआणि इतर माहिती देणार आहोत चला तर मग जाणून घेऊया. असा लगेच करू शकता अर्ज सुरुवातीला NEET UG नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्या. मुख्यपृष्ठावर, तुम्हाला NEET UG अर्ज फॉर्म 2023 लिंक दिसेल. लिंक वर क्लिक करा. आता एक नवीन लॉगिन/नोंदणी पृष्ठ उघडेल. NTA NEET पोर्टलवर लॉग इन करा आणि अर्ज तपासा. सर्व आवश्यक तपशीलांसह फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा. अर्ज डाउनलोड करा. IT Jobs: मोठी IT कंपनी भारतात करणार पदभरती; इंजिनीअरसह विविध पदांसाठी ओपनिंग्स; करा अप्लाय NEET 2023 परीक्षेची तारीख पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET 2023 परीक्षा 7 मे रोजी घेतली जाईल. एनटीएने जाहीर केले की नीट यूजी परीक्षेची तारीख आधीच जाहीर केली आहे. डिग्रीपर्यंत शिक्षण नाही तरीही उभी केली जगातील सर्वात मोठी कंपनी; गॅरेजमधून झाली होती सुरुवात NEET UG परीक्षेचा नमुना NEET 2023 च्या प्रश्नपत्रिकेत एकूण 200 प्रश्न असतील, ज्यामध्ये 180 प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक असेल. सर्व प्रश्नांपैकी 45-45 प्रश्न भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातून विचारले जातील. जीवशास्त्र विभागात नव्वद प्रश्न असतील. उमेदवारांना सांगण्यात आले आहे की त्यांना NEET 2023 च्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेची तयारी करावी लागेल.
इतकी असेल अर्जाची फी यंदा सर्व उमेदवारांसाठी NEET साठी अर्ज शुल्क वाढवण्यात आले आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना नोंदणीसाठी 1700 रुपये द्यावे लागतील. EWS आणि OBC साठी अर्ज शुल्क 1600 रुपये आहे. SC, ST, PWD आणि तृतीय लिंग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 900 रुपये आहे. भारताबाहेरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून 9500 रुपये भरावे लागतील.