मुंबई, 07 मार्च: सध्याच्या काळात मनासारखी नोकरी मिळणं अत्यंत कठीण बनलं आहे. त्यातच कोरोना काळ आणि जगभरात असलेल्या मंदीच्या सावटामुळे जवळपास सर्वच उद्योग-व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे रोजगारसंधी कमी होत आहेत. परिणामी, नोकरी मिळणं आणखी अवघड झालं आहे. अर्थात या स्थितीला आयटी आणि कम्प्युटर क्षेत्रही अपवाद नाही. गेल्या काही महिन्यांपासून मंदीच्या सावटामुळे दिग्गज आयटी कंपन्यांनी नोकरकपात आणि कॉस्ट कटिंगचं धोरण अवलंबलं आहे. यामुळे आयटी क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. तुम्ही आयटी क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर तुम्हाला एका नावाजलेल्या कंपनीत नोकरीची संधी मिळू शकते. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, टेक्निकल लीड आदी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. `कंटेंट डॉट टेकगिग`ने या विषयी माहिती दिली आहे. विप्रो ही देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे. जर तुम्ही फ्रेशर किंवा प्रोफेशनल तंत्रज्ञ असाल आणि विप्रोमध्ये जॉब करण्याची तुमची इच्छा असेल तर या फर्मने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. विप्रोमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससह विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे. या विषयीचा तपशील जाणून घेऊया. डिग्रीपर्यंत शिक्षण नाही तरीही उभी केली जगातील सर्वात मोठी कंपनी; गॅरेजमधून झाली होती सुरुवात विप्रो कंपनीच्या चेन्नई येथील कार्यालयात टेक्निकल लीड या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे टीमसाठी डॅशबोर्ड आणि स्कोअर्सचा परफॉर्मन्स रिव्ह्यू करण्याची क्षमता हवी. टेक्निकल सपोर्ट आणि प्रक्रिया मार्गदर्शनाच्या पॅरामीटर्सनुसार परफॉर्मन्स सुधारण्यासाठी टीमला सपोर्ट करण्याची तयारी असावी. प्राप्त झालेल्या सर्व प्रश्नांची नोंद घेणे, त्याचा पाठपुरावा करणे आणि डॉक्युमेंटेशन करणं,समस्या सोडवण्यासाठी पावलं उचलणं आणि एकूण यशस्वी आणि अयशस्वी प्रश्नांची नोंद करता आली पाहिजे. क्लायंटच्या सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी मानक प्रक्रिया आणि प्रक्रियांचे पालन केले आहे की नाही हे उमेदवाराला तपासता आले पाहिजे. कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद केलेल्या एसएलएनुसार क्लायंटच्या प्रश्नांचे निराकरण करता आले पाहिजे. क्लायंटशी संवाद साधून समस्या निवारणासाठी टीमला समजेल अशा पद्धतीनं प्रक्रिया आणि उत्पादनाविषयीची माहिती तयार करणं. भविष्यातील समस्या टाळण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे ट्रेंड शोधण्याकरिता कॉल लॉगचं डॉक्युमेंटेशन आणि विश्लेषण करता आलं पाहिजे. क्लायंटच्या गंभीर समस्या लवकर सोडवण्यासाठी टीम लीडरकडे त्या मांडता आल्या पाहिजेत. महिन्याचा तब्बल 1,77,500 रुपये पगार आणि कोणतीही परीक्षा नाही; ‘या’ नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये भरती; करा अप्लाय विप्रोच्या बेंगळुरू येथील कार्यालयात सॉफ्टवेअर इंजिनीअर हे पद भरले जाणार आहे. या पदासाठी इच्छूक उमेदवाराला प्रकल्प योजना किंवा क्लायंटच्या गरजेनुसार योग्य मॉडेल विकसित करण्यासाठी CAD,CAE सारख्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअरवर काम करता आले पाहिजे. सॉफ्टवेअरवर तयार केलेल्या प्रोटोटाइप आणि डिझाइनची चाचणी घेता आली पाहिजे. तसेच त्याच्या सर्व मर्यादा (इम्पॅक्ट अॅनालिसीस, स्ट्रेस अॅनालिसीस) तपासता आल्या पाहिजेत. तपशील आणि सॉफ्टवेअरचे घटक पूर्णपणे सॉफ्टवेअर प्रणालीत एकत्रित करून त्याची ऑपरेशनल व्यवहार्यता निश्चित करता आली पाहिजे. इंजिनिअरिंग ड्रॉईंग आणि आऊटलाइन मॉडेलनुसार मूळ नमुना तयार करता आला पाहिजे. क्लायंटकडून प्राप्त झालेल्या कोणत्याही नवीन रिक्वायरमेंट्ससाठी फेल्युअर इफेक्ट मोड अॅनालिसीस करता आले पाहिजे. व्हर्च्युअल पद्धतीने सिम्युलेशन्सच्या माध्यामातून क्लायंटला सोल्यूशन देता आले पाहिजे. क्लायंट आणि सॉफ्टवेअर इंटिग्रेशन टीमने दाखवलेल्या दोषांचे निराकरण करता आले पाहिजे. क्लायंटसाठी सॉफ्टवेअर पडताळणी योजना आणि गुणवत्ता हमी प्रक्रिया विकसित करता यावी. समस्या निवारण, डीबग आणि सध्याची सिस्टीम कमी वेळेत आणि कमाल कार्यक्षमतेसह अपग्रेड करता आली पाहिजे. क्लायंटच्या समाधानासाठी पुरेशा रिझोल्युशनसह प्रोग्राम तयार ठेवणे आणि क्लायंटच्या फीडबॅकचे मूल्यांकन करणे आले पाहिजे. इंडियन आर्मीत भरती व्हायचंय ना? मग NDA बद्दल माहिती असायलाच हवं; इथे मिळेल A-Z माहिती विप्रोच्या चेन्नई कार्यालयात डेव्हऑप्स इंजिनीअर या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांना मल्टिपल टेक्नॉलॉजी स्टॅकवर डेव्ह ऑप्स पाइपलाइन तयार करून ती व्यवस्थापित करता आली पाहिजे. IaC पद्धतीचा वापर करून ऑटोमेटेड इन्व्हायरमेंट सेटअप, कॉन्फिगरेशन आणि व्यवस्थापन करता यावं. मायक्रो सर्व्हिसेस बेस्ड हायब्रीड इको सिस्टीममध्ये लाइफसायकल व्यवस्थापित करता यावी. सिक्युरिटी अॅसेसमेंट, पॅचिंग आणि सिक्रेट्स/ विशेषाधिकार व्यवस्थापन व्यवस्थापित करता यावेत. सुरक्षा आणि डाटा संरक्षण उपायांची अंमलबजावणी करता यावी. वेगवान सॉफ्टवेअर विकास आणि रिलीज प्रक्रियेच्या सर्व पैलूंमध्ये सहभागी होण्याची तयारी असावी. उत्पादनाशी संबंधित मूळ समस्यांचे कारण आणि त्याचे विश्लेषण करता यावे. IaC मेंटेंन करता यावा आणि पाइपलाइन प्लेबुक्सचे तपशीलवार डॉक्युमेंटेशन करता यावे.
विप्रोच्या गुरुग्राम येथील कार्यालयात सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर या पदासाठी भरती केली जाणार आहे. या करिता इच्छुक उमेदवारांना HTML5,CSS3 सह वेबमार्कअपची सखोल समज असावी. LESS आणि SASS सारख्या सर्व्हर साइड CSS प्री प्रोसेसिंग प्लॅटफॉर्मची मूलभूत माहिती असावी. भविष्यातील वेब टेक्नॉलॉजी ही अधिक प्रतिसादात्मक, आकर्षक आणि अनुभवात्मक होण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असावी. उमेदवाराला क्लायंटसाइड स्क्रिप्टिंग, जावा स्क्रिप्ट, फ्रेमवर्कस, जे क्युरी, अँग्युलर आणि टाइपस्क्रिप्टची जाण असावी. अॅडव्हान्स जावा स्क्रिप्ट लायब्ररी आणि फ्रेमवर्कचे चांगले ज्ञान असावे. उमेदवाराला डिझाइन थिंकिंग मेथडॉलॉजीमध्ये काम करण्याचा अनुभव असावा किंवा ती जाणून घेण्याची इच्छा असावी. अजाइल डेव्हलपमेंट मेथडॉलॉजीचा अनुभव असावा किंवा ती जाणून, समजून घेण्याची इच्छाशक्ती असावी.