या देशांमध्ये
मिळतं FREE शिक्षण 

आजकालच्या काळात अनेकांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असते. 

पण परदेशात शिक्षण म्हंटलं की खूप पैसे लागतात असं अनेक विद्यार्थ्यांना वाटत असतं.

काही देश असे आहेतही जिथे शिक्षणासाठी खूप पैसे आणि बँक बॅलन्स असणं आवश्यक आहे.   

पण असेही काही देश आहेत जिथे तुम्हाला फ्रीमध्ये शिक्षण मिळू शकतं. जाणून घेऊया अशा देशांबद्दल. 

फिनलँड मध्ये, विद्यार्थ्यांना बॅचलर किंवा मास्टर्समध्ये कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. 

जर्मनी हा एक देश आहे जिथे मोफत शिक्षण दिले जाते, इथे स्थानिक मुलांनाच नाही तर परदेशी मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाते. 

मोफत शिक्षण देणाऱ्या देशांमध्ये नॉर्वेचेही नाव आहे. या देशातही स्थानिक मुलांबरोबरच परदेशी मुलांनाही मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे

तसंच बेल्जीयम, इटली आणि फ्रांसमध्येही फ्री शिक्षण देण्यात येतं. 

या देशांमध्ये फ्रीमध्ये शिक्षण घेण्यासाठी काही प्रमुख अटी आणि शर्थी तुम्हाला मान्य करणं आवश्यक आहे.