मराठी बातम्या / बातम्या / करिअर / कोणत्याही ट्युशन किंवा कोचिंगशिवाय MPSC क्रॅक करायची आहे ना? मग काहीही करा पण या चुका करू नका

कोणत्याही ट्युशन किंवा कोचिंगशिवाय MPSC क्रॅक करायची आहे ना? मग काहीही करा पण या चुका करू नका

MPSC परीक्षेचा अभ्यास करण्याच्या Tips

आज आम्ही तुम्हाला MPSC परीक्षेचे क्लासेस लावले नसतील तर अभ्यास करताना कोणत्या चुका करू नये हे सांगणार आहोत. यातील एक चूकही तुम्हाला महागात पडू शकते.


मुंबई, 28 जानेवारी: महाराष्ट्र लोक सेवा आयोग म्हणजेच MPSC. दरवर्षी या परीक्षेला राज्यातील लाखो उमेदवार बसतात. अनेकांना परीक्षा दिल्यानंतर स्वतःच्या मेहनतीवर अधिकारी बनण्याची संधीही मिळते. मात्र हे संधी मिळण्यासाठी अतोनात परिश्रम आणि मेहनत घ्यावी लागते. जीवाचं रान करून अभ्यास करावा लागतो. तसंच काही विद्यार्थी यासाठी निरनिराळ्या प्रकारचे क्लासेसही लावतात. या क्लासेसचं शुल्क लाखोंच्या घरात असतं. प्रत्येक उमेदवाराला ते परवडेलच असं नाही. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला MPSC परीक्षेचे क्लासेस लावले नसतील तर अभ्यास करताना कोणत्या चुका करू नये हे सांगणार आहोत. यातील एक चूकही तुम्हाला महागात पडू शकते. म्हणूनच या चुका कशा टाळायच्या जाणून घेऊया.

करंट अफेअर्सचा अभ्यास न करणे

फक्त MPSC च नाही तर कोणत्याही सरकारी परीक्षेचा अभ्यास करताना परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत चालू घडामोडींची माहिती ठेवा. MPSC परीक्षेत चालू घडामोडी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने दररोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावावी तसंच ऑनलाईन करंट अफेअर्सच्या काही टेस्टही द्याव्यात.

IIT Bombay Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मुंबईत जॉबचा गोल्डन चान्स; IIT मध्ये होतेय या पदांसाठी भरती

आत्मविश्वासानं अभ्यास न करणे

अनेकदा तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकाल की नाही हे तुमच्यातील आत्मविश्वासावर अवलंबून असते. त्यामुळे अभ्यास करताना किंवा परीक्षेची तयारी करताना आत्मविश्वास ढासळू देऊ नका. तुम्ही केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा.

Post Office Recruitment: 10वी पास असाल तर सरकारी नोकरीची ही संधी सोडूच नका; थेट होतेय 2508 जागांसाठी मेगाभरती

Syllabus समजून न घेणे

सर्वप्रथम MPSC परीक्षेचा अभ्यासक्रम (MPSC Exam Syllabus) समजून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे अभ्यासाचा आराखडा तयार करण्यात मदत होते. यासाठी तुम्हाला MPSC कन्या ऑफिशिअल साईटवरून परीक्षेचा अभ्यासक्रम डाउनलोड करावा लागेल. सिलॅबस मिळाल्यानंतर अभ्यासाची तुमची एक चेकलिस्ट तयार करा. या चेकलिस्टनुसार अभ्यास करत राहा.

Top Paying Govt Jobs: या 10 पैकी एक सरकारी नोकरी मिळाली ना तर लाईफ सेट म्हणून समजा; पैशांचा येईल पूर

गेल्या काही वर्षांचे पेपर न बघणे

MPSC ची तयारी करणाऱ्या प्रत्यके उमेदवाराने मागच्या काही वर्षांचे पेपर सोडवून बघणं खूप महत्त्वाचं आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की कोणत्या विषयांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. यासोबतच कमी महत्त्वाच्या विषयांचीही माहिती मिळेल. पेपर पॅटर्न समजून घेण्यासाठी किमान 10 वर्षांचे पेपर सोडवा. हे आपल्याला वेळेचे व्यवस्थापन करण्यास देखील मदत करेल.

First published: January 28, 2023, 14:54 IST
top videos
  • Nagpur News: विदर्भातील सर्वात मोठं फुलांचं मार्केट माहितीये का? दिवसाला होते 40 लाखांची उलाढाल, Video
  • Wardha News: महात्मा गांधींनी सुरू केलेल्या भांडारातून ताक कधी प्यायला का? Video
  • Pune News : राज्यावर येणार जल संकट, ज्योतिषांनी वर्तवला चिंता व्यक्त करणारा अंदाज VIDEO
  • Pune News : श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक, पाहा Video
  • Weather Update: पाऊस कधी येणार, काय घ्यावी खबरदारी? हवामान विभागाचा शेतकऱ्यांसाठी अलर्ट, Video
  • Tags:Career, Career opportunities, Education, Job alert, MPSC Examination

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स