मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Top Paying Govt Jobs: या 10 पैकी एक सरकारी नोकरी मिळाली ना तर लाईफ सेट म्हणून समजा; पैशांचा येईल पूर

Top Paying Govt Jobs: या 10 पैकी एक सरकारी नोकरी मिळाली ना तर लाईफ सेट म्हणून समजा; पैशांचा येईल पूर

या 10 पैकी एक सरकारी नोकरी मिळाली ना तर लाईफ सेट म्हणून समजा

या 10 पैकी एक सरकारी नोकरी मिळाली ना तर लाईफ सेट म्हणून समजा

भारतातील सरकारी नोकरी अडचणीच्या काळात मदत देण्याव्यतिरिक्त, नोकरीची सुरक्षा, सेवानिवृत्ती लाभ, भत्ते आणि इतर फायदेदेखील प्रदान करते. त्यामुळेच दरवर्षी लाखो तरुण असंख्य स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास प्रवृत्त होतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 जानेवारी: आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि स्थिर जीवन जगण्याची इच्छा असेल तर सरकारी नोकऱ्या हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. जे आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता सरकारी नोकरीतून मिळते ती खासगी नोकरीत मिळत नाही. सरकारी नोकरीमध्ये तुमची आणि तुमच्या कुटुंबियांचीही काळजी घेतली जाते. शिवाय, सेवानिवृत्त झाल्यानंतरही पेन्शन दिली जाते. भारतातील सरकारी नोकरी अडचणीच्या काळात मदत देण्याव्यतिरिक्त, नोकरीची सुरक्षा, सेवानिवृत्ती लाभ, भत्ते आणि इतर फायदेदेखील प्रदान करते. त्यामुळेच दरवर्षी लाखो तरुण असंख्य स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास प्रवृत्त होतात. भारतातील काही सरकारी नोकऱ्यांमध्ये भरपूर वेतन मिळते. अशा कोणत्या नोकऱ्या आहेत याबाबत 'ऑलिव्ह बोर्ड'नं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

2022 मध्ये भारतातील सर्वाधिक पगाराच्या 10 सरकारी नोकऱ्या

1. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस): आयएएस आणि आयपीएस होणं ही खूप प्रतिष्ठेची बाब आहे. ही देशातील सर्वांत प्रतिष्ठित सरकारी नोकरी आहे. या दोन पदांपर्यंत पोहचण्यासाठी इच्छुक उमेदवारांना सर्वांत कठीण सरकारी परीक्षा द्यावी लागते. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना राहण्यासाठी सरकारी घरं आणि प्रवासासाठी गाड्या दिल्या जातात. भारतामध्ये आयएएस आणि आपीएस अधिकाऱ्यांना 56 हजार 100 रुपये मासिक मूळ वेतन मिळतं.

मोठी बातमी! MHT CET 2023 परीक्षेसाठी वेबसाईट झाली लाँच; कधी होणार कोणती परीक्षा? इथे बघा डिटेल्स

2. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम: सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतील (पीएसयू) नोकऱ्यासुद्धा मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. एचपीसीएल, आयओसीएल, ओएनजीसी, बीएचईएल हे सार्वजनिक क्षेत्रातील काही प्रसिद्ध युनिट्स आहेत. पीएसयूमध्ये दरवर्षी अनेक कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. या नोकऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक फायदे देतात. उत्तम पगार रचना, कामाचे निश्चित तास, नोकरीची सुरक्षितता आणि कामाचा कमी ताण यामुळे अनेक तरुण या क्षेत्रात नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. सार्वजनिक क्षेत्रातील इंजीनिअर्सला मासिक 24 हजार 900 ते 50 हजार 500 रुपयांपर्यंत पगार मिळतो. त्यांचा वार्षिक सीटीसी 10 लाख 80 हजारांपर्यंत असतो. सार्वजनिक क्षेत्रातील मॅनेजमेंट ट्रेनीजला मासिक 24 हजार 900 ते 50 हजार 500 रुपयांपर्यंत पगार मिळतो. त्यांचा वार्षिक सीटीसी 14 लाख 10 हजार रुपयांपर्यंत असतो.

3. संरक्षण सेवा- नौदल, लष्कर आणि हवाई दल: तुम्ही अनेक फायद्यांसह चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल, तर संरक्षण सेवा हा सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. चांगल्या पगाराची नोकरी असण्याव्यतिरिक्त, वैद्यकीय सुविधा, सरकारी निवासस्थान आणि वाहतूकखर्च यांसारखे फायदे मिळतात. संरक्षण सेवेतील ज्युनियर ग्रेड कमांडंटला 15 हजार 600 ते 39 हजार 100 रुपये वेतन आणि सात हजार 600 रुपये ग्रेड पे मिळते. डेप्युटी कमांडंटला 15 हजार 600 ते 39 हजार 100 रुपये वेतन आणि सहा हजार 600 ग्रेड पे मिळते. असिस्टंट कमांडंटला 15 हजार 600 ते 39 हजार100 रुपये वेतन आणि पाच हजार 400 रुपये ग्रेड पे मिळते.

Job Interview वेळी पगाराचा आकडा सांगितला अन् हातचा गेला अक्षयचा जॉब; तुम्ही अशी चूक करू नका

4. भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस): आयएफएस अधिकाऱ्यांना राष्ट्राच्या प्रतिनिधींचा दर्जा दिला जातो. या नोकरीमुळे तुम्हाला परदेशी प्रतिनिधींसोबत अनेक परराष्ट्र विषयासंबंधी बैठकांना उपस्थित राहण्याची आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळते. ही एक अतिशय चांगल्या पगाराची नोकरी आहे ज्यामध्ये खूप प्रतिष्ठा आणि आदर मिळतो. परराष्ट्र सेवेतील सीनिअर टाइम स्केलमधील कर्मचाऱ्याला 15 हजार 600 ते 39 हजार 100 रुपये वेतन आणि सहा हजार 600 रुपये ग्रेड पे मिळते. ज्युनिअर टाइम स्केलमधील कर्मचाऱ्याला 15 हजार 600 ते 39 हजार 100 रुपये मासिक वेतन आणि पाच हजार 400 रुपये ग्रेड पे मिळते.

JOB ALERT: 10वी ते पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी जॉबची मोठी संधी; 'या' शाळेत बंपर ओपनिंग्स

5. इस्रो, डीआरडीओ शास्त्रज्ञ/अभियंता: रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये स्वारस्य असलेले इंजिनीअर्स इस्रो आणि डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ आणि अभियंता या पदांसाठी अर्ज करू शकतात. या संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांना राहण्याची उत्तम सोय मिळते. तसेच या संस्थांमध्ये काम केल्याने तुम्हाला समाजात आदर मिळतो. या संस्थांमधील शास्त्रज्ञ पदावरील व्यक्तीला 60 हजार रुपये मासिक पगार मिळतो.

6. आरबीआय ग्रेड B: आरबीआय ग्रेड B ही बँकिंग क्षेत्रातील सर्वाधिक पगाराची नोकरी आहे. या पदावरील व्यक्तीला 67 हजार रुपये मासिक वेतन मिळते.

7. भारतीय वन सेवा: भारतीय वन सेवा ही निसर्गप्रेमी असलेल्या आणि शहरी जीवनातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी सर्वोत्तम नोकऱ्यांपैकी एक आहे. भारतीय वन अधिकारी सामान्यतः जंगलात काम करतात. ते वन्यजीव आणि पर्यावरणाचे संरक्षण करतात. या खात्यातील व्यक्तीला 60 हजार रुपये वेतन मिळते.

8. सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याते: अध्यापन हे भारतीय समाजातील सर्वात प्रतिष्ठित करिअरपैकी एक आहे. शिक्षक होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. भारतामध्ये सहाय्यक प्राध्यापक/व्याख्यात्याला 50 हजार रुपये वेतन मिळतं.

देशातील तरुणांसाठी Zomato च्या CEO ची मोठी घोषणा! तब्बल 800 जागांवर करणार बंपर पदभरती

9. कर्मचारी निवड आयोग: एसएससी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमीशन सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस आणि सीपीओसारख्या विविध परीक्षांचं आयोजन करतं. या नोकऱ्या केंद्र सरकारच्या अखत्यारित असतात. या विभागातील कर्मचाऱ्यांना 45 हजार रुपये वेतन मिळते.

10. परराष्ट्र मंत्रालयात एएसओ: परराष्ट्र मंत्रालयात असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून (एएसओ) नोकरी मिळविण्यासाठी उमेदवाराला SSC CGL परीक्षा क्रॅक करणं आवश्यक आहे.

जर तुम्हाला वरील प्रतिष्ठित नोकऱ्यांपैकी एखादी नोकरी मिळवायची असेल, तर तुम्हाला फार अभ्यास करावा लागेल.

First published:

Tags: Career opportunities, Central government, Job, Jobs Exams