JOIN US
मराठी बातम्या / करिअर / वडील सोडून गेले, आई लोकांचे कपडे शिवून घर चालवते, लेक आज झाला असिस्टेंट ऑडिट अधिकारी!

वडील सोडून गेले, आई लोकांचे कपडे शिवून घर चालवते, लेक आज झाला असिस्टेंट ऑडिट अधिकारी!

बिहार राज्याच्या शिरपेचाचा मानाचा तुरू खोवणारं काम एका मुलाने केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आशिष कुमार (पश्चिम चंपारण), 16 मे : बिहार राज्याच्या शिरपेचाचा मानाचा तुरू खोवणारं काम एका मुलाने केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मंगलपूर औसानी येथील रहिवासी असलेल्या रवी सिंगने असिस्टेंट ऑडिट ऑफिसर स्तरावरील परीक्षेत सीजीएलमध्ये देशभरात 98 वा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर त्याची सहायक लेखापरीक्षक अधिकारी पदासाठीही निवड झाली आहे. यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच त्याची आई शिलाई काम करून त्याला मोठे केल्याने संघर्षातून मोठं यश मिळवल्याचे बोलले जात आहे.

रवी यांनी यापूर्वी रेल्वे, आयकर विभाग आणि सांख्यिकी अधिकारी ही पदे भूषवली आहेत. विशेष म्हणजे लहानपणापासून त्यांचे क्लास टू ऑफिसर होण्याचे स्वप्न होते. तो आज या शिखरापर्यंत पोहोचला आहे.

शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतातच कापला केक आणि भरवला पिकाला, पाहा काय आहे कारण Video

संबंधित बातम्या

कुटुंबात अनेक समस्यांचा सामना करूनही रवीने आपले स्वप्न सोडले नाही. रेल्वेत नोकरी मिळाल्यानंतरही त्यांनी तयारी सुरूच ठेवली. निकाल जाहीर झाल्यावर रवी आणि त्याच्या कुटुंबीयांना आनंद झाला. विशेष म्हणजे रवीच्या वडिलांचे निधन झाले आहे.

घरची आर्थिक परिस्थिती पाहता आई विमला सिंह यांनी शिवणकाम करून रवीचे शिक्षण पूर्ण केले. वाईट परिस्थिती असतानाही आईने आपल्या मुलाच्या अभ्यासात कधीही आर्थिक अडचण येऊ दिली नाही.

रवीन दिलेल्या माहितीनुसार, CGL या परिक्षेत 98 वी रँक मिळाल्यानंतर त्याला असिस्टंट ऑडिट ऑफिसरचे पद मिळाले. आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांने आई विमला सिंह यांच्या त्याग आणि मेहनतीला दिले आहे. 2013 मध्ये 12वी नंतर 2015 मध्ये ग्रॅज्युएशन आणि 2018 मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन रवीने केले आहे.  

जाहिरात
112 वर्षांपासून सुरू आहे ‘हे’ मशिन, शाहू महाराजांशी आहे जवळचं कनेक्शन, Video

रवीच्या यशाबद्दल त्याची आई विमला सिंह म्हणाली की, त्याने सुरुवातीपासूनच आपल्या मुलाला अधिकारी म्हणून पाहण्याचे स्वप्न पाहिले होते. अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे फळ त्याला अखेर मिळाले असल्याचे त्या म्हणाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या