JOIN US
मराठी बातम्या / करिअर / MH BOARD 12TH RESULT: गेल्या वर्षीच्या तुलनेत कसा असेल 12वीचा निकाल? ऑफलाईन परीक्षांचा होणार फायदा की तोटा?

MH BOARD 12TH RESULT: गेल्या वर्षीच्या तुलनेत कसा असेल 12वीचा निकाल? ऑफलाईन परीक्षांचा होणार फायदा की तोटा?

ऑफलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना नव्याने आणि दरवर्षीप्रमाणे अभ्यास करावा लागला आजी परीक्षा द्यावी लागली. पण याचा परिणाम काय होणार?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जून: आता बारावीच्या निकालाची तारीख (Maharashtra HSC Result 2022 date and time) जाहीर करण्यात आली आहे. अखेर बारावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे. आता हा बारावीचा निकाल (HSC Result 2022 Maharashtra board website) तुम्ही News18लोकमतच्या वेबसाईटवरही (12th result on News18lokmat) बघू शकणार आहात. यासाठी तुम्हाला या बातमीत (Maharashtra 12th result link) दिलेल्या बोर्डाच्या निकालामध्ये आपली माहिती भरावी लागणार आहे. पण हा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत नक्की कसा असेल? हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बारावीचा निकाल हा विशेष मूल्यांकन पद्धतीने लावण्यात आला होता. यामध्ये दहावी आणि अकरावीचे गुण मार्क्स देण्यात आले होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे बोर्डाकडून ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याला अनेक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून विरोधही केला. राज्यतील अनेक शहरांमध्ये बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. संपूर्ण वर्ष ऑनलाईन शिक्षण दिल्यायनंतर परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनंच व्हाव्यात यावर विद्यार्थी ठाम होते. मात्र राज्य सरकारनं मागणी मान्य न करता ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेतल्या. MH BOARD 12TH RESULT: News18lokmat.com वर दिसेल थेट दिसेल निकाल, असं करा रिजिस्टर या झालेल्या ऑफलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना नव्याने आणि दरवर्षीप्रमाणे अभ्यास करावा लागला आजी परीक्षा द्यावी लागली. पण याचा परिणाम काय होणार? ऑलीं परीक्षा घेतल्यामुळे निकाल घटणार की वाढणार? (Maharashtra state board 12th result 2022) असे काही प्रश्न सर्वांनाच पडले आहेत. पण त्याआधी गेल्या वर्षीचा निकाल कसा होता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. काय होता गेल्या वर्षीचा निकाल गेल्या वर्षी विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आलेला राज्याचा बारावीचा एकूण निकाल 99.63% इतका होता. तर यात बारावी विज्ञान विभागाचा निकाल 99.45% इतका होता तर बारावी वाणिज्य विभागाचा निकाल 99.91% होता. तसंच बारावी कला विभागाचा निकाल 99.83% आणि बारावी एमसीव्हीसी निकाल 98.80% इतका होता. एकूणच काय तर मागील वर्षी [परीक्षा झाल्या नसल्या तरी निकाल मात्र ऐतिहासिक पद्धतीनं अधिक होता. यंदा कसा लागेल निकाल यंदा बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या आहेत. तसंच विशेष मुल्याकंन पद्धतही नाही. त्यामुळे साहजिकच यंदाचा निकाल हा काही प्रमाणात कमी लागण्याची शक्यता आहे. मात्र विद्यार्थ्यांनी जीवतोड मेहनत करून परीक्षा दिली असल्यामुळे निकालाची टक्केवारी फारशी कमी होणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 12th Exam Result : 12वीचा निकाल SMSद्वारे पाहण्यासाठी ही आहे सोपी पद्धत, सेकंदात result मिळणार हातात कुठे बघता येईल निकाल महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल 2021 News18.com वर पाहता येईल. तुम्ही MSBSHSE च्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. 12वीचे निकाल 2020 - lokmat.news18.com वर लाइव्ह 10वी, 12वी 2021 बोर्ड रिझल्ट ऑनलाइन बघू शकता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) 18 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान इयत्ता 12वी (HSC) परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या, तर इयत्ता 10वी (SSC) परीक्षा 3 ते 23 मार्च या कालावधीत होणार होत्या. शेवटची परीक्षा 23 मार्च रोजी होती. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे MSBSHSE ने पुढे ढकलले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या