Home /News /career /

12th Exam Result : 12वीचा निकाल SMSद्वारे पाहण्यासाठी ही आहे सोपी पद्धत, सेकंदात result मिळणार हातात

12th Exam Result : 12वीचा निकाल SMSद्वारे पाहण्यासाठी ही आहे सोपी पद्धत, सेकंदात result मिळणार हातात

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीच्या निकालाचे (12 th exam result) वेध लागले होते. मात्र आता विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. How to check result on mobile (SMS)

    मुंबई, 07 जून : महाराष्ट्रात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. (10th and 12th board exam) दरम्यान या परिक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यावरून बराच काळ तर्कविर्तक सुरु होता. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीच्या निकालाचे (12 th exam result) वेध लागले होते. मात्र आता विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. मुलांना घरबसल्या बारावीचा निकाल पाहता येणार आहे. ते ही तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या एसएमएसद्वारे 12 वीचा निकाल पाहता येणार आहे. How to check result on mobile (SMS)

    उद्या (8 जून) रोजी दुपारी 1 वाजता 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. अनेकदा निकालाच्या वेळेस वेबसाईट्सवर एकदम मारा झाल्याने वेबसाईट्स हॅंग होतात. अशावेळी विद्यार्थ्यांची निराशा टाळण्यासाठी मोबाईलवर निकाल पाहण्याची सोय बोर्डाकडून करण्यात आली आहे. (Result of 12th will be Announced Tomorrow) 

    हे ही वाचा : HSC Result: 12वीच्या निकालाची तारीख ठरली, पाहा कधी आणि कुठे पाहता येणार निकाल

    राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. त्यानुसार उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा निकाल लागणार आहे.

    महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 एसएमएसद्वारे पाहण्याची पद्धत महाराष्ट्र 12वीचा निकाल 2022 एसएमएसद्वारे पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी दिलेल्या फॉरमॅटमध्ये एसएमएस टाइप करणे आवश्यक आहे. या फॉरमॅटमध्ये एसएमएस टाइप करा : MHHSC<space>सीट क्रमांक लिहून 57766 वर पाठवा. तुम्हाला तुमचा रिझल्ट अवघ्या काही सेंकदात मिळणार आहे.
    या लिंकवर पहा निकाल https://lokmat.news18.com/category/career/

    www.mahresult.nic.in 

    mh-hsc.ac.in

    www.hscresult.mkcl.org

    https://www.mahahsscboard.in

    www.IndiaResult.com

    www.maharashtraeducation.com

    किती वाजता जाहीर होणार निकाल

    दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचा निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

    निकाल हा ऑनलाईन पद्धतीनं जरी इंटरनेटवर दिसत असला तरीही क्रॉस चेक केल्यानंतर निकालाच्या दोन ते तीन प्रिंट्स घेऊन ठेवणं आवश्यक आहे. कॉलेजमधून निकालाची ओरिजनल प्रिंट मिळण्यासाठी अनेक दिवस लागतात. मात्र तेवढ्यात 13 वी आणि इतर प्रवेश सुरु होत आहेत. म्हणूनच निकालाची प्रिंट घेऊन ठेवणं आवश्यक आहे.

    हे ही वाचा : Corona Virus In Mumbai: मुंबईत चौथी लाट?, 5 दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ

    सर्व माहिती तपासा

    निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.

    निकालानंतर 'ही' कागदपत्रं असतील आवश्यक

    गुणपत्रिका (Board Marksheet)

    स्थलांतर प्रमाणपत्र. (Migration Certificate)

    उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate)

    कॉलेज सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)

    आधार कार्ड (Aadhar card)

    जातीचा दाखला (Caste Certificate)

    रहिवासी दाखला (Address Proof)

    पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photos)

    Published by:Sandeep Shirguppe
    First published:

    Tags: Board Exam, Exam result

    पुढील बातम्या