Home /News /career /

MH BOARD 12TH RESULT: News18lokmat.com वर दिसेल थेट दिसेल निकाल, असं करा रिजिस्टर

MH BOARD 12TH RESULT: News18lokmat.com वर दिसेल थेट दिसेल निकाल, असं करा रिजिस्टर

ता स्टेट बोर्डाच्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. म्हणूनच आज तुम्हाला हे निकाल कुठे आणि कसे बघावे याबाबत माहिती देणार आहोत.

    मुंबई, 07 जून:  कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण (Online Education) देण्यात येत होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षाही (Board Exam Result) करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline Board Exams) घेण्यात आल्या आहेत.त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा (12th Board Result date announced MH) जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता स्टेट बोर्डाच्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. म्हणूनच आज तुम्हाला हे निकाल कुठे आणि कसे बघावे याबाबत माहिती देणार आहोत. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, उद्या 12 वीचा निकाल लागणार (Result of 12th will be Announced Tomorrow) आहे. उद्या म्हणजे 08 जून रोजी राज्यातील 12 वीचा निकाल लागेल. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. त्यानुसार उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा निकाल लागणार आहे. News 18 लोकमत वर दिसेल निकाल  बारावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास झालेली अडचण बघता बारावीच्या निकालाच्या (Result MH HSC result) दिवशी अशी अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. विशेष म्हणजे ग निकाल तुम्ही हा निकाल News 18 लोकमतच्या ऑफिशिअल वेबसाईटवर थेट बघू शकणार आहात. त्यामुळे निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे. यासाठी तुम्हाला आधी वेबसाईटवर रजिस्टर करावं लागणार आहे. अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन यासाठी आधी https://lokmat.news18.com/career/ हा लिंकवर जा. यानंतर बोर्डाच्या निकालाची कोणतीही बातमी उघडा. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी विंडो दिसेल. इथे तुमचा क्लास म्हणजे दहावी किंवा बारावी सिलेक्ट करा. यानंतर तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भर. यानंतर Register या बटनेवर क्लिक करा. अशा पद्धतीनं नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल बघता येईल.
    सर्व माहिती तपासा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही. निकालानंतर 'ही' कागपत्रं असतील आवश्यक गुणपत्रिका (Board Marksheet) स्थलांतर प्रमाणपत्र. (Migration Certificate) उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate) कॉलेज सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) आधार कार्ड (Aadhar card) जातीचा दाखला (Caste Certificate) रहिवासी दाखला (Address Proof) पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photos)
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Board Exam, Exam Fever 2022, Exam result, HSC, Maharashtra News, State Board

    पुढील बातम्या