थोड्याच वेळात शिक्षण विभागाची पत्रकार परिषद
मुंबई, 02, जून: गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (ssc result 2023 maharashtra board)आज म्हणजेच 02 जूनला जाहीर होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. गेल्या वर्षी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे निकाल काही प्रमाणात कमी लागला होता. तसंच यंदा बारावीच्या निकालातही घट बघायला मिळाली आहे. त्यामुळे दहावीचा निकाल (ssc result today) नक्की कसा लागतो यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
यापूर्वी म्हणजेच सकाळी अकरा वाजता शालेय शिक्षण विभागातर्फे महत्त्वाची पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेतशिक्षण विभागाचे अधिकारी यंदाच्या निकालासंदर्भातील काही महत्त्वाची माहिती देणार आहेत. Maharashtra SSC Result 2023 Live updates: थोड्याच वेळात निकाल, न्यूज18 लोकमतवर सर्वात आधी पाहा काय असतील पत्रकार परिषदेतील मुद्दे यंदाचा एकूण निकाल किती टक्के आहे. तसंच यंदा कोणता विभाग निकालाच्या टक्केवारीत अव्वल आहे. कोणत्या विभागाचा निकाल कमी आहे. विभागनिहाय निकालाची टक्केवारी काय. यासह इतर काही म्हह्त्वाच्या मुद्द्यांवर ही पत्रकार परिषद होणार आहे. SSC Result 2023: लक्ष द्या! 10वीनंतर फक्त 12वी हाच पर्याय नाही; ‘हे’ शॉर्ट टर्म कोर्सेस करूनही होऊ शकता मालामाल एका क्लिकवर बघा निकाल सुरुवातीला https://lokmat.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/ ही लिंक ओपन करा. यानंतर तुम्हाला बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे. किती वाजता जाहीर होणार निकाल दरवर्षी प्रमाणे यंदाही दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होणार आहे.हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येणार आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी संपूर्ण 16,38,964 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 8,89,505 विद्यार्थ्यांची संख्या होती तर 7,49,458 इतकी विद्यार्थिनींची संख्या होती.