मुंबई, 31 मे: बघता बघता जून महिना सुरु झाला आहे. जून महिना म्हंटलं की सरावात आधी डोळ्यांसमोर येतात ते म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल. मात्र यंदा बोर्डाचा बारावीचा निकाल नेहमीपेक्षा लवकर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बारावीच्या निकालाला एक आठवड्याचा कालावधी उलटून गेला असताना नक्की स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. बोर्डाकडून अजूनही निकालाबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नसली तरी नेहमीप्रमाणे बारावीच्या निकालानंतर एका आठवड्यातच दहावीचा निकाल जाहीर होतो. त्यामुळे आता येत्या काही दिवसातंच दहावीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Maharashtra SSC Result 2023: दहावीत मार्क्स कमी पडलेत तरी टेन्शन घेऊ नका; आधी ‘या’ 3 लोकांना जाऊन भेटासूत्रांनी दिलेल्या खात्रीशीर माहितीनुसार, महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल या आठवड्यातच जाहीर होण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र यासंबंधीची घोषणा आज बोर्डाकडून केली जाऊ शकते असं काही सूत्रांचं म्हणणं आहे. हा निकाल याच आठवड्यातच जारी केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हा निकाल तुम्हाला News18 Lokamt च्या ऑफिशिअल वेबसाईटवर बघता येणार आहे.
12वी विसरा; दहावीनंतरच्या ‘या’ भन्नाट डिप्लोमा कोर्सेसबद्दल ऐकलंय का? लाखो रुपये मिळेल सॅलरीतुमच्या शिक्षकांना भेटा News18 लोकमत वर असा बघा निकाल सुरुवातीलाhttps://lokmat.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/ ही लिंक ओपन करा. यानंतर तुम्हाला कोणत्याही एका बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी हे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे. यानंतर दहावी निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे. विशेष म्हणजे तुम्हाला हा निकाल अवघ्या काही सेकेंदांमध्ये बघता येणार आहे SSC Result 2023: लक्ष द्या! 10वीनंतर फक्त 12वी हाच पर्याय नाही; ‘हे’ शॉर्ट टर्म कोर्सेस करूनही होऊ शकता मालामाल निकाल आणि निकालानंतर कोणते कोर्सेस करावे, शिक्षणाचे काय ऑप्शन आहेत? तसंच चांगल्या पगाराचा जॉब कसा मिळवावा? या सर्व विषयांची माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा. निकाल बघण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचा रोल नंबर नीट बघून एंटर करणं आवश्यक आहे. आईचं नाव हे तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करावं लागणार आहे. त्यानंतर येणारं बेसिक बेरीज किंवा वजाबाकीचं गणित सोडवून तुम्हाला निकाल बघता येणार आहे.