महाराष्ट्र पोलीस भरती
मुंबई, 06 डिसेंबर: शिंदे आणि फडणवीस सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरती चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रानातील तरुणांना पोलीस होण्याचा गोल्डन चान्स मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र ही भरती प्रक्रिया होणार तरी कशी? आणि या भरती परीक्षेचा सिलॅबस काय असणार आहे याबद्दल अनेकांना प्रश्न पडले आहेत. म्हणूनच गणित विषयाचा सिलॅबस नंतर आज आम्ही तुम्हाला बौद्धिक चाचणी या विषयाचा सिलॅबस सांगणार आहोत. चा तर मग जाणून घेऊया. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रक्रियेत दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी होणार आहे. सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. या लेखी परीक्षेत गणित, बौद्धिक चाचणी आणि मराठी व्याकरण हे विषय असणार आहेत. असं असेल लेखी परीक्षेचं पॅटर्न 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील. मोठी बातमी! आता पीएचडी करणं होणार सोपं; UGC कडून ‘या’ नवीन नियमांची घोषणा; होणार फायदा बौद्धिक चाचणी विषयाचा अभ्यासक्रम
विषय | विषय |
---|---|
क्रमबध्द मालिका | विसंगत पद ओळखणे |
संख्या संचातील अंक शोधणे | विधाने व अनुमाने, |
समान संबंध किंवा परस्पर संबंध | आकृतीची आरशातील प्रतिमा |
आकृत्यांमधील अंक शोधणे | आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब |
वेन आकृती | दिशा व अंतर |
कालमापन (दिनदर्शिका) | घड्याळ |
रांगेवर आधारित प्रश्न | नाते संबंधांची ओळख |
सांकेतिक लिपी किंवा भाषा | निरीक्षण आणि आकलन |
खूशखबर..खूशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 551 जागांसाठी भरतीची मोठी घोषणा; इतका मिळेल पगार बौद्धिक चाचणी विषयांमध्ये एकूण पंचवीस प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यापैकी प्रत्येक प्रश्नाला एक मार्कांचं वेटेज असणार आहे. तसंच एकूण मार्कांमध्ये स्कोर करण्यासाठी या विषयाचा अभ्यास करणं खूप आवश्यक असणार आहे. त्यामुळे तुम्हालाही हे पोलीस व्हायचं असेल तर हट्टे-कट्टे असण्यासोबतच बौद्धिक चाचणीही पास करणं आवश्यक आहे.