मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

खूशखबर..खूशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 551 जागांसाठी भरतीची मोठी घोषणा; इतका मिळेल पगार

खूशखबर..खूशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 551 जागांसाठी भरतीची मोठी घोषणा; इतका मिळेल पगार

बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 06 डिसेंबर: बँक ऑफ महाराष्ट्र इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिकारी स्केल II, III, IV आणि V या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

अधिकारी स्केल II, III, IV आणि V (Officers post in Scale II, III, IV and V)

एकूण जागा - 551 जागांसाठी

महिन्याचा तब्बल 1,80,000 रुपये पगार अन् पात्रता फक्त ग्रॅज्युएशन; सरकारी नोकरीसाठी करा अप्लाय

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अधिकारी स्केल II, III, IV आणि V (Officers post in Scale II, III, IV and V) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Bachelor Engineer Degree in any discipline/– B. Tech / B. E in Computer Science / IT / MCA / MCS / M. Sc/CA / CMA / CFA/MA/ Graduate पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतकं असेल शुल्क

UR/OBC/EWS: 1180/- रुपये

SC/ST/ PwBD: 118/- रुपये

PH/Female: फी नाही

SSC GD Constable: नक्की काय असतं जीडी कॉन्स्टेबलचं काम? किती मिळतो पगार? इथे मिळेल माहिती

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स

पासपोर्ट साईझ फोटो

MAHAGENCO Recruitment: महिन्याचा 70,000 रुपये पगार, तब्बल 661 जागा; शेवटचे काही दिवस शिल्लक; करा अर्ज

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 23 डिसेंबर 2022

JOB TITLEBank Of Maharashtra Recruitment 2022
या पदांसाठी भरतीअधिकारी स्केल II, III, IV आणि V (Officers post in Scale II, III, IV and V) एकूण जागा - 551 जागांसाठी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिकारी स्केल II, III, IV आणि V (Officers post in Scale II, III, IV and V) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Bachelor Engineer Degree in any discipline/– B. Tech / B. E in Computer Science / IT / MCA / MCS / M. Sc/CA / CMA / CFA/MA/ Graduate पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतकं असेल शुल्क इतकं असेल शुल्क UR/OBC/EWS: 1180/- रुपये SC/ST/ PwBD: 118/- रुपये PH/Female: फी नाही
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bankofmaharashtra.in/current-openings#  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Bank exam, Bank Of Maharashtra, Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams