मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मोठी बातमी! आता पीएचडी करणं होणार सोपं; UGC कडून 'या' नवीन नियमांची घोषणा; होणार फायदा

मोठी बातमी! आता पीएचडी करणं होणार सोपं; UGC कडून 'या' नवीन नियमांची घोषणा; होणार फायदा

UGC कडून 'या' नवीन नियमांची घोषणा

UGC कडून 'या' नवीन नियमांची घोषणा

तुम्ही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर हे नियम माहित असणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया पीएचडीसाठी कोणते मोठे बदल आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 06 डिसेंबर: पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर संशोधन करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अलीकडेच यूजीसीने पीएचडी नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. ज्यामध्ये काही आवश्यक अटी जोडण्यात आल्या आहेत. जर तुम्ही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर हे नियम माहित असणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया पीएचडीसाठी कोणते मोठे बदल आहेत.

पीएचडीच्या कालावधीमध्ये बदल

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पीएचडी अभ्यासक्रमाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यूजीसीने घालून दिलेल्या नियमांनुसार पीएचडी पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी किमान तीन वर्षांचा असेल. पीएचडी करणाऱ्या उमेदवाराला प्रवेशाच्या तारखेपासून जास्तीत जास्त 6 वर्षांचा कालावधी दिला जाईल.

खूशखबर..खूशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 551 जागांसाठी भरतीची मोठी घोषणा; इतका मिळेल पगार

महिलांसाठी खास सुविधा

यूजीसीचे अध्यक्ष म्हणतात की यूजीसीच्या नवीन नियमांनुसार, विद्यार्थी लहान वयातच पीएचडी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील. महिला पीएचडी आणि दिव्यांग उमेदवारांना 2 वर्षांची सूट दिली जाईल. यासोबतच कोणत्याही संस्थेत सेवा देणारे कर्मचारी किंवा शिक्षक अर्धवेळ पीएचडी करू शकतील.

हे शिक्षक नाही करू शकणार पीएचडी

अशा शिक्षकांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा तीन वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांना नवीन संशोधकांना त्यांच्या देखरेखीखाली घेण्याची परवानगी दिली जाणार नाही, परंतु आधीच नोंदणीकृत संशोधकांचे मार्गदर्शन सुरू राहील.

महिन्याचा तब्बल 1,80,000 रुपये पगार अन् पात्रता फक्त ग्रॅज्युएशन; सरकारी नोकरीसाठी करा अप्लाय

पीएचडी पुनर्नोंदणीसाठी नवीन नियम

यूजीसीच्या नियमांनुसार, पीएचडी संशोधकाने पुन्हा नोंदणी केल्यास, अशा परिस्थितीत त्याला जास्तीत जास्त दोन वर्षांचा कालावधी दिला जाईल. परंतु पीएचडी प्रोग्राम पूर्ण करण्याचा एकूण कालावधी पीएचडी प्रोग्राममध्ये प्रवेश केल्याच्या तारखेपासून आठ वर्षांपेक्षा जास्त नसावा तर हे लागू होईल.

नोकरीसह करता इयर पीएचडी

आतापर्यंत सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना किंवा शिक्षकांना संशोधन करण्यासाठी त्यांच्या विभागातून अभ्यास रजा घ्यायची होती, मात्र नवीन नियमानुसार सेवेत असलेले कर्मचारी किंवा शिक्षकही अर्धवेळ पीएचडी करू शकणार आहेत.

SSC GD Constable: नक्की काय असतं जीडी कॉन्स्टेबलचं काम? किती मिळतो पगार? इथे मिळेल माहिती

रिसर्च पेपर सबमिट करण्याची गरज नाही

नवीन नियमानुसार आता ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षणाद्वारे पीएचडी करता येणार नाही. आता पीएचडीच्या नव्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे म्हणजेच संशोधन प्रक्रियेदरम्यान दोन शोधनिबंध प्रकाशित करण्याची सक्ती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

First published:

Tags: Education