JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra Board 12th Result: धक-धक वाढली; अवघ्या काही तासांमध्ये 12वीचा निकाल; या Links आताच करा सेव्ह

Maharashtra Board 12th Result: धक-धक वाढली; अवघ्या काही तासांमध्ये 12वीचा निकाल; या Links आताच करा सेव्ह

Maharashtra Board 12th Result: विद्यार्थ्यांची आणि पालकांची धक-धक वाढली आहे. पण निकाल नक्की कसा बघता येणार आहे आणि त्यासाठी महत्त्वाच्या लिंक्स कोणत्या असणार आहेत हे जाणून घेऊया.

जाहिरात

या Links आताच करा सेव्ह

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 मे: गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर आज म्हणजेच 25 मे 2023 ला स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं आहे. निकाल जाहीर होण्यासाठी अवघ्या काही तासांहुनही कमी वेळ उरला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आणि पालकांची धक-धक वाढली आहे. पण निकाल नक्की कसा बघता येणार आहे आणि त्यासाठी महत्त्वाच्या लिंक्स कोणत्या असणार आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. News 18 लोकमत वर थेट बघता येईल निकाल बारावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास झालेली अडचण बघता बारावीच्या निकालाच्या (Result MH HSC result) दिवशी अशी अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. विशेष म्हणजे हा निकाल तुम्ही News 18 लोकमतच्या ऑफिशिअल वेबसाईटवर थेट बघू शकणार आहात. त्यामुळे निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे. यासाठी तुम्हाला आधी वेबसाईटवर रजिस्टर करावं लागणार आहे.

अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन यासाठी आधी https://lokmat.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/  या लिंकवर जा. यानंतर बोर्डाच्या निकालाची कोणतीही बातमी उघडा. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी विंडो दिसेल. इथे तुमचा क्लास म्हणजे दहावी किंवा बारावी सिलेक्ट करा. यानंतर तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भर. यानंतर Register या बटनेवर क्लिक करा. अशा पद्धतीनं नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला निकालासंदर्भात लिंक येईल. यानंतर तुम्हाला निकाल जाहीर झाल्या झाल्या लिंक ओपन करून निकाल बघता येईल. निकाल बघून तुमचा निकाल सेव्हही करता येईल. या वेबसाईट्सवरही चेक करू शकता निकाल www.lokmat.news18.com mahahsscboard.in mahresult.nic.in

निकालानंतर सर्वात आधी तपासा या गोष्टी निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या