JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: करिअरमध्ये सतत यश आणि पगारवाढ हवीये? मग 'या' पाच गोष्टी करतील मदत

Career Tips: करिअरमध्ये सतत यश आणि पगारवाढ हवीये? मग 'या' पाच गोष्टी करतील मदत

आपल्या फिल्डमध्ये टिकून राहण्यासाठी आणि करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी विविध कौशल्यं आत्मसात करणं महत्त्वाचं आहे.

जाहिरात

'या' पाच गोष्टी करतील मदत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 एप्रिल: सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे. नोकरी असो वा बिझनेस, तुम्हाला स्वतःची स्किल्स सातत्याने डेव्हलप करून या स्पर्धेत टिकून राहावं लागेल. सध्या प्रत्येकच क्षेत्रात स्पर्धा खूप वाढली आहे. असंख्य उमेदवार एकाच नोकरीसाठी इच्छुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा परिस्थितीत आपल्या फिल्डमध्ये टिकून राहण्यासाठी आणि करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी विविध कौशल्यं आत्मसात करणं महत्त्वाचं आहे. या संदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलंय. सरकारी नोकऱ्यांमध्ये शाश्वतता असली तरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये करिअर ग्रोथसाठी, चांगलं यश व पगार मिळवण्यासाठी आणि जास्तीतजास्त संधी मिळविण्यासाठी स्वत:ला अप स्कील करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची कौशल्यं वाढवल्याने तुमची विश्वासार्हता निर्माण होतेच; पण पगार वाढण्याची शक्यताही वाढते. आज अशाच पाच टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या तुम्हाला तुमच्या करिअर ग्रोथसाठी मदत करतील.

स्वतःला UpSkill करा सध्याच्या वेगवान जगात तुम्हाला स्वत:ची स्कील्स वाढवणं आवश्यक आहे. तुमच्या स्किल्समुळे तुमची व्हॅल्यु वाढते. तुमच्या सध्याच्या प्रोफेशनमध्ये मोलाची भर घालणारी विविध प्रकारची स्कील्स शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी काम करा. आजच्या डिजिटल युगात एखादी व्यक्ती सहजपणे अनेक गोष्टी शिकू शकते आणि त्यात प्रमाणपत्रही मिळवू शकते. नेटवर्किंग तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत करणार्‍या लोकांशी संबंध व संपर्क निर्माण करण्याच्या संधी शोधा. योग्य प्रकारे नेटवर्किंग करता आल्यास त्याचा तुमच्या करिअरला मोठा फायदा होऊ शकतो. LinkedIn सारखा प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रोफेशनल्सशी संवाद साधण्यास मदत करू शकते. चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांचे कर्दनकाळ; सोडली होती परदेशी बँकेतील नोकरी; या दबंग IPS ची सर्वत्र चर्चा गोल सेट करा तुमच्या भविष्यातील ध्येयांबद्दल नेहमी क्लिअर राहा. तुमचे गोल सेट करा आणि ते साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न करा. ही प्रॅक्टिस तुम्हाला फोकस्ड व कामात उत्साही राहण्यास मदत करू शकते. पत्रकारांनो, परदेशात शिक्षण घ्यायचंय? मग Oxford युनिव्हर्सिटीत जर्नालिस्ट फेलोशिप करा ना; ही घ्या माहिती जबाबदारी घ्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळू नका, कारण ही तीच संधी असू शकते जिच्या शोधत तुम्ही आहात. इतरांसोबत काम करण्याची आणि टीम गोल्समध्ये योगदान देण्याची तुमची इच्छाशक्ती नेहमी दिसायला हवी. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण करू शकता आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी क्रेडिबिलिटी वाढू शकते. अरे याला जिद्द म्हणावी की काय? 1962 पासून तब्बल 56 वेळा दिली 10वीची परीक्षा; 57व्या वेळी झाले पास पगाराची बोलणी  फेअर पे स्ट्रक्चर नसलेल्या कामामुळे कर्मचारी डिमोटिव्हेट होऊ शकतात. त्यामुळे पगाराची बोलणी करताना संकोच करू नका. पगारवाढीची विनंती करण्यापूर्वी किंवा त्याबद्दल चर्चा करण्यापूर्वी तुमच्या स्कील्सचं मूल्यांकन करा आणि योग्य रिसर्च करा. सर्वांत वाईट परिस्थितीत हीच येऊ शकते की कंपनी तुम्हाला तुमच्या मागणीसाठी नकार देऊ शकते, परंतु तुम्हाला पगाराची बोलणी करण्याचा अनमोल अनुभव मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या