JOIN US
मराठी बातम्या / करिअर / JEE आणि CAT केली क्लिअर, UPSC मध्ये पहिली रँक; 1.25 कोटींचा पगार सोडून झाले IAS

JEE आणि CAT केली क्लिअर, UPSC मध्ये पहिली रँक; 1.25 कोटींचा पगार सोडून झाले IAS

अनेक तरुण मुलं वर्षानुवर्षे UPSC ची तयारी करत असल्याचं आपण पाहतो, मात्र या अधिकाऱ्याने UPSC दोन वेळेस क्रॅक केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 मे : दरवर्षी, लाखो विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीची परीक्षा देतात. ही देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. सनदी अधिकाऱ्याची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असल्याने यासाठी किमान वर्षभर तयारी करणं आवश्यक आहे, असं उमेदवारांना वाटतं. आयएएस गौरव अग्रवाल यांचा विचार मात्र यापेक्षा काहीसा वेगळा होता. या अधिकाऱ्याने केवळ यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं नाही तर त्यामध्ये पहिली रँक मिळवणारा तो राजस्थानमधील पहिली व्यक्ती ठरला. यावर समाधान न मानता गौरव यांनी जेईई अ‍ॅडव्हान्स आणि कॅट या इंजिनीअरिंग आणि एमबीएशी संबंधित कठीण परीक्षांमध्येही यश मिळवलं. आयपीएस गौरव अग्रवाल यांचा एकूण प्रवास कसा होता, ते जाणून घेऊया. गौरव अग्रवाल यांचं शालेय शिक्षण जयपूर येथे पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी 2001 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी आयआयटी जेईई परीक्षेत यश मिळवलं. या परीक्षेत त्यांना अखिल भारतीय पातळीवर 45 वी रँक मिळाली. त्यांनी आयआयटी कानपूरमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले पण त्यांची पदवी दुसऱ्या सेमिस्टरपर्यंत वाढवण्यात आली. गौरव पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये एका विषयात अनुत्तीर्ण झाले, त्यामुळे त्यांचे एक वर्ष वाया गेले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी झाला नाही. त्यांनी कठोर परिश्रमातून यश मिळवलं. या दरम्यान, ते 2005 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी कॅट परीक्षा उत्तीर्ण झाले. एमबीएसाठी ही देशातील सर्वांत कठीण परीक्षा मानली जाते. IPS Success Story: 15 महिन्यांत तब्बल 16 दहशतवाद्यांना ठोकलं; AK-47 घेऊन आसामच्या जंगलात फिरतात या दबंग IPS या परीक्षेत त्यांना 99.94 टक्के गुण मिळाले. त्यानंतर गौरव यांनी आयआयएम लखनौमधून फायनान्स विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. या परीक्षेत त्यांना सुवर्णपदक मिळालं.यानंतर गौरव यांनी हाँगकाँगमधील सिटीग्रुपमध्ये सुमारे साडेतीन वर्ष इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केलं. पण 1.25 कोटी रुपये पगाराची ही नोकरी सोडून त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गौरव यांनी 2012 मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. त्यावर्षी त्यांनी यूपीएससी परीक्षेत 244 वी रँक मिळवली आणि आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. आयपीएसनंतर ते हैदराबाद येथील पोलीस अकादमीत प्रशिक्षणासाठी गेले. परंतु, आयएएस अधिकारी बनण्याचा त्यांचा निश्चय कायम होता. गौरव यांनी यूपीएससी परीक्षेच्या मुलाखतीनंतर अवघ्या चार दिवसांनी डॉ. प्रीती ऐरुन यांच्याशी विवाह केला. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या कुटुंबाने आणि पत्नीने त्यांना मोलाची साथ दिली. 2013 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात, गौरव फ्लाईंग कलर्ससह परीक्षेत पुन्हा उत्तीर्ण झाले. या परीक्षेत एअर-1 मिळवणारे ते राजस्थानमधील पहिले व्यक्ती ठरले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या