JOIN US
मराठी बातम्या / करिअर / काय सांगता! मुलांना अवघ्या 1 रुपयात शिकवतात 'हे' शिक्षक; आतापर्यंत 5000 विद्यार्थ्यंना दिलंय शिक्षण

काय सांगता! मुलांना अवघ्या 1 रुपयात शिकवतात 'हे' शिक्षक; आतापर्यंत 5000 विद्यार्थ्यंना दिलंय शिक्षण

इंदूरच्या एका शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण अवघ्या एक रुपयात देण्याचा निर्धार केला आहे. म्हणजेच महिनाभराचं शिक्षण फक्त 30 रुपयांत.

जाहिरात

अवघ्या 1 रुपयात शिकवतात 'हे' शिक्षक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदूर, 07 मार्च: आजकालच्या काळात शिक्षण म्हंटलं की लाखो रुपये खर्च होतात. अगदी मुलांच्या प्ले ग्रुपच्या शाळेच्या शुल्कापासून तर दहावीपर्यंत लाखो रुपये शुल्क असतं. मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी इतकी फी भरणं शक्य नसतं. तसंच विद्यार्थ्यांना लाखो रुपये फी असणाऱ्या शाळांप्रमाणे सुविधाही मिळू शकत नाहीत. मात्र इंदूरच्या एका शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण अवघ्या एक रुपयात देण्याचा निर्धार केला आहे. म्हणजेच महिनाभराचं शिक्षण फक्त 30 रुपयांत. नक्की कोण आहेत हे शिक्षक आणि का ते मुलांना अवघ्या एक रुपयात शिकवतात? बघूया. खरे तर समाजसेवक डॉ.मनिषसिंग गुर्जर हे 10 वर्षांपासून समाजात शिक्षण आणि आरोग्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.

डॉ. मनीष सांगतात की, त्यांनी आतापर्यंत राज्यातील 5000 मुलांना प्रतिदिन 1 रुपये या दराने शिक्षण दिले आहे. त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये करिअर समुपदेशन आणि प्रेरणादायी सेमिनार घेतले आहेत. NEET UG 2023: उमेदवारांसाठी मोठी बातमी; अखेर रजिस्ट्रेशन प्रोसेस झाली सुरु; अशी करा नोंदणी असहाय मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त करणे. त्यासोबतच अनेक जिल्ह्यांमध्ये उच्च शिक्षणासाठी स्पोकन इंग्लिश क्लासेसचेही आयोजन करण्यात आले आहे. मोफत आरोग्य शिबिरे व मोफत शिक्षण शिबिरे घेण्यावर त्यांचा मुख्य भर आहे. IT Jobs: मोठी IT कंपनी भारतात करणार पदभरती; इंजिनीअरसह विविध पदांसाठी ओपनिंग्स; करा अप्लाय हे सर्व काम ते कोणत्याही सरकारी मदतीशिवाय, राजकीय मदतीशिवाय करत आहेत. भविष्यात हे काम मोठ्या प्रमाणावर करण्याची योजना असल्याचे ते सांगतात. असाच एक गट म्हणजे मेडिको एज्युकेशन ग्रुप, ज्याने महाविद्यालयीन काळात 10 विद्यार्थी आणि बी.ई.चे शिक्षण घेत असलेल्या गरजूंनी एकत्र येऊन 30 रुपये दरमहा स्पोकन इंग्लिशचे वर्ग द्यायला सुरुवात केली.

आत्तापर्यंत त्यांनी राज्यातील सुमारे 10 जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये जाऊन मुलांना इंग्रजी भाषा शिकवली आहे. ग्रुपचे डॉ.मनिषसिंग गुर्जर सांगतात की, ते 2010 साली एका कॉल सेंटरमध्ये मुलाखतीसाठी गेले होते. त्यात त्यांची निवड झाली होती. त्या मुलाखतीत अनेकांना इंग्रजी येत नसल्यामुळेच उरले होते. तेव्हाच मला वाटलं की अशा गरीब लोकांना इंग्रजी शिकवलं पाहिजे, तेव्हापासून मी झोपडपट्टीत शिकवायला सुरुवात केली. डॉ.गुर्जर यांनी आतापर्यंत पाच हजार मुलांना इंग्रजी शिकवले आहे.त्यासोबतच त्यांनी 200 मुलांना खाजगी शाळांमध्येही प्रवेश मिळवून दिला आहे.याशिवाय त्यांनी कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात जवळपास 15 मोफत शिबिरे आयोजित केली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या