व्हायरल झालेला मेसेज खरा की खोटा?
मुंबई, 06 एप्रिल: सध्या जगातल्या अनेक देशांमध्ये आर्थिक मंदीचं सावट आहे. माहिती-तंत्रज्ञान, कम्प्युटर क्षेत्रासह काही क्षेत्रांतल्या कंपन्यांनी कामगार कपातीचं धोरण स्वीकारलं आहे. काही दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपातदेखील केली आहे. भारतात आर्थिक मंदीच्या सावटाचा कोणताही परिणाम सध्या दिसत नाही. त्यामुळे भारतातल्या आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपातीबाबत अद्याप थेट भूमिका घेतलेली नाही; पण सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत असून, त्यात ‘इन्फोसिस कंपनी 15 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे,’ असं म्हटलं आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. `टेकगिग डॉट कॉम`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. 2023मध्ये भारतीय आयटी कंपन्या नोकरभरती थांबवणार असल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या आहेत; मात्र इन्फोसिसने कोणत्याही कर्मचाऱ्याला काढून टाकल्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तथापि, अलीकडेच कंपनीने सी-सूट नेतृत्वात एक मोठा फेरबदल केला आहे. कंपनी 15 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याची बातमी खोटी असल्याचं टाइम्स व्हेरिफाइड प्रोग्रामने केलेल्या फॅक्ट चेकनंतर स्पष्ट झालं आहे. ई-मेल लिहून की थेट बॉसशी बोलून; कंपनीतून Resign देण्याची योग्य पद्धत नक्की कोणती? एक्सपर्ट्स म्हणतात… टाइम्स व्हेरिफाइड हा जाणकार व्यक्तींचा एक गट आहे. त्यात स्थानिक प्रशासन, केंद्र सरकारचे प्रतिनिधी, पत्रकार आणि संपादकांचा समावेश आहे. त्याअंतर्गत इन्फोसिसशी संबंधित व्हायरल मेसेजची वस्तुस्थिती तपासली असता तो मेसेज खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. इन्फोसिस कंपनीने आपल्या तीन हजारांहून अधिक उच्च कुशल प्रोग्रामरना एलिट ग्रुप-स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी ग्रुपच्या माध्यमातून सक्षम केलं आहे. तसंच कंपनी फ्रेशर्सना प्राधान्य, प्रोत्साहन आणि चांगला पगार देत आहे, असं इन्फोसिसच्या एचआरनं एका मीडिया मुलाखतीत नुकतंच सांगितलं. CRPF Recruitment: 1-2 नाही तर तब्बल 1,29,929 पदांसाठी सर्वात मोठ्या पदभरतीची घोषणा; पात्रता फक्त 10वी; करा अप्लाय भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून, या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2012मध्ये इंटरनेट सॅव्ही व्यक्तींची संख्या 137 दशलक्ष होती. ती 2019मध्ये वाढून 600 दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे सोशल मीडियावर खोट्या माहितीचा प्रसार झाल्याने नुकसानाचं प्रमाण वाढलं आहे. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून फेक न्यूज प्रसारित केल्या जात आहेत. चुकीच्या माहितीमुळे एखाद्या व्यक्तीचा मीडियावरचा विश्वास कमी होऊ शकतो. परिणामी भविष्यात सत्य आणि कल्पित गोष्टींमध्ये फरक करणं अधिक कठीण होईल. IAS ते MBBS तब्बल 20 पदव्या आणि 42 विद्यापीठांमध्ये प्रवेश; भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तीबद्दल ऐकलंय का? राष्ट्रीय साक्षरता ट्रस्टने केलेल्या फेक न्यूज आणि क्रिटिकल लिटरसी स्टडीच्या निष्कर्षांनुसार, 12 ते 15 वयोगटातल्या निम्म्याहून अधिक तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या कळतात. अंदाजे केवळ दोन टक्के किशोरवयीन मुलांकडे खऱ्या आणि खोट्या बातम्यांमधला फरक ओळखण्यासाठी आवश्यक मूलभूत साक्षरता कौशल्य आहे. सर्वेक्षणात 50 टक्के तरुणांनी खोट्या माहितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या विषयावर ज्या शिक्षकांना प्रश्न विचारण्यात आले, त्याबाबत त्यांनी सांगितलं, की तरुणांमध्ये जगाविषयीचा दृष्टिकोन फारसा प्रगल्भ नाही. तसंच त्यांच्यात चिंता, आत्मसन्मान कमी असणं आणि न्यूनगंड या समस्यादेखील वाढत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीच एक फेक न्यूज व्हायरल झाली होती. त्यात देशभरात कोविड रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचा आकडा बघता देशात 29 मार्चपासून लॉकडाउन लावण्यात येईल, असं म्हटलं होतं. ही माहितीदेखील खोटी असल्याचे निष्पन्न झाले. कारण भारतात कोणताही लॉकडाउन नाही आणि नजीकच्या काळात अशा प्रकारे लॉकडाउन लागू करण्याची घोषणा कोणत्याही सरकारी संस्थेकडून झालेली नाही.