रेल्वेमध्ये जॉबच्या संधी
नवी दिल्ली, 30 जून : भारतीय रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) मध्ये चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. उच्चशिक्षित व अनुभवी उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. थेट मुलाखतीतून ही भरती होणार असून, मुलाखतीची तारीख 14 जुलै 2023 आहे. हे पद दोन वर्ष कालावधीकरिता असेल. या भरती प्रक्रियेबाबत अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं असून, त्यात पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, मुलाखतीची तारीख, नियुक्ती झाल्यानंतर देण्यात येणारा पगार आदींबाबत सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आयआरसीटीसीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट व कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेत. निवडलेल्या उमेदवारांना सिकंदराबाद येथील विभागीय कार्यालयामध्ये नियुक्ती देण्यात येईल. मात्र, नियुक्त केलेल्या उमेदवाराची बदली भारतामध्ये कुठेही करण्याचा अधिकार आयआरसीटीसीकडे असणार आहे. चला तर, या पदासाठी नेमकी पात्रता काय आहे, पगार काय दिला जाणार आहे, हे जाणून घेऊ. फक्त क्लर्क किंवा PO च नाही तर बँकेत असते कृषी अधिकाऱ्यांची जागा; असा मिळतो जॉब वयोमर्यादा काय? रेल्वे विभागाच्या अधिसूचनेनुसार, चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 40 वर्षांपर्यंत आहे. एससी/एसटी अर्जदारांसाठी वयोमर्यादा 5 वर्षांनी, ओबीसी अर्जदारांसाठी 3 वर्षांनी आणि पीडब्ल्यूडी अर्जदारांसाठी 10 वर्षांनी शिथिल आहे. माजी सैनिकांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. अधिकृत अधिसूचनेमध्ये याबाबत सविस्तर माहिती आहे. पात्रता भरतीच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, अर्जदारांची नियुक्ती 2 वर्षांच्या कालावधीसाठी केली जाईल. मात्र, नियुक्तीचा कालावधी आवश्यकता व समाधानकारक कामगिरीच्या आधारावर एक वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटचे शिक्षण झालेलं असावं. उमेदवाराला किमान 2 वर्षांचा पदव्युत्तर अनुभव असावा, त्याच्याकडे 1 वर्षाचा ERP/SAP आणि Oracle चा अनुभव असावा. ऑडिटचा अनुभव असलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त, इतर उमेदवारांकडे लेखा आणि कर आकारणीचा किमान एक वर्षाचा अनुभव असावा. ऑनलाईन जॉब सर्च करताय? तुमची खासगी माहिती लिक तर होत नाहीये ना? अशी घ्या काळजी उमेदवाराची होणार थेट मुलाखत भरतीच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवाराची निवड थेट मुलाखतीतून करण्यात येईल. ही मुलाखत 14 जुलै 2023 रोजी आयआरसीटीसी झोनल ऑफिस / दक्षिण मध्य विभाग, 1 ला मजला, ऑक्सफर्ड प्लाझा, एसडी रोड, सिकंदराबाद - 500003 येथे होणार आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांनी भरतीच्या अधिकृत अधिसूचनेसोबत दिलेला अर्ज, आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींचा एक संच आणि दोन अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो, पडताळणीसाठी मुलाखतीच्या ठिकाणी सबमिट करणं आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीला उपस्थित राहावं. तब्बल 1,85,000 रुपये महिन्याचा पगार आणि जॉबसाठी परीक्षाच नाही; इथे होतेय भरती पद संख्या व पगार अधिकृत अधिसूचनेमध्ये दिल्याप्रमाणे, ही भरती प्रक्रिया दोन पदांसाठी राबवली जात आहे. निवडलेल्या उमेदवाराला मासिक वेतन 70000 रुपये देण्यात येईल. दरम्यान, रेल्वे विभागात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची एक चांगली संधी आहे. परंतु, या पदासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावं.