जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Online Jobs Fraud: ऑनलाईन जॉब सर्च करताय? तुमची खासगी माहिती लिक तर होत नाहीये ना? अशी घ्या काळजी

Online Jobs Fraud: ऑनलाईन जॉब सर्च करताय? तुमची खासगी माहिती लिक तर होत नाहीये ना? अशी घ्या काळजी

तुमची खासगी माहिती लिक तर होत नाहीये ना?

तुमची खासगी माहिती लिक तर होत नाहीये ना?

आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन जॉब शोधताना काय काळजी घेतली पाहिजे याबाबत सांगणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 जून : टेक्नॉलॉजीमुळे ऑनलाईन आणि सोशल मीडियावर जॉब शोधण्यासाठी आणि जॉब्सबद्दल माहिती देण्यासाठी अनेक वेबसाईट्स उपलब्ध असतात. यापैकी काही वेबसाईट्स आपल्याकडून पैसे घेतात तर काही वेबसाईट्स फ्री असतात. मात्र अशा अनेक वेबसाईट्सवर अनेक फ्रॉड आणि डेटा चोरी करणारे लोकंही असतात. जे खोटी वेबसाईट तयार करून तुमची संपूर्ण खासगी माहिती चोरी करू शकतात. तसंच तुमच्या अकाउंटमधून पैसे चोरी करू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन जॉब शोधताना काय काळजी घेतली पाहिजे याबाबत सांगणार आहोत. वेब पेज सिक्युरिटी तपासा तुम्ही ओपन केलेल्या वेबसाईटचं वेब पेज सिक्युअर आहे ना? हे आधी तपासा. हे ओळखण खूप सोपं आहे. जर वेब पेज सुरक्षित नसेल तर साइटला http ऐवजी https असं असेल. अशा प्रकारे काळजी घेतल्यानं आपली वैयक्तिक माहिती चुकीच्या हातात जाणार नाही. Bank Jobs: फक्त क्लर्क, मॅनेजर किंवा PO च नाही तर बँकेत असते कृषी अधिकाऱ्यांची जागा; अशी मिळेल नोकरी प्रायव्हसी पॉलिसीकडे लक्ष द्या सुप्रसिद्ध नामांकित कंपन्या त्यांच्या यूजर्ससाठी प्रायव्हसी पॉलिसी ठेवतात. यात नाव, ईमेल पत्ता किंवा जास्तीत जास्त फोन नंबर आणि पत्ता विचारला जातो. बर्‍याच वेबसाईट्स सोशल सिक्युरिटी देखील देतात, प्रत्येक वेळी लॉग इन करताना त्यासाठी सिक्युरिटी कोड द्यावा लागतो. अशा साइट विश्वसनीय असतात. MahaTransco Recruitment 2023: अजून एक मेगाभरती! राज्याच्या वीज पारेषण विभागात 3129 पदांसाठी ओपनिंग्स; इथे करा अर्ज खासगी माहिती देऊ नका ऑनलाईन जॉब शोधताना तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर जर ईमेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स, खाते क्रमांक, क्रेडिट-डेबिट कार्ड संबंधित माहिती यासारखी वैयक्तिक माहिती विचारली गेली असेल तर ती देऊ नका. लक्षात ठेवा नामांकित कंपन्या अशी माहिती विचारत नाहीत, कंपनी योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटला नक्की भेट द्या आणि तुम्ही बघितलेला जॉब खरंच आहे का याची खात्री करून घ्या.

News18लोकमत
News18लोकमत

नुकसान झाल्यास रिपोर्ट करा कोणत्याही कारणास्तव जर साईटवरून आपली खासगी माहिती चोरीला गेली किंवा पैसे चोरीला गेले तर गप्प बसू नका. Internet fraud complaint center वर ऑनलाइन तक्रार दाखल करा. जर जास्त नुकसान झालं असेल तर पोलिसांच्या सायबर सेल मध्येही तक्रार नोंदविली जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात