मल्टिनॅशनल हॉटेल ग्रुपसोबत काम करण्याची सुवर्णसंधी
मुंबई, 13, जून: हयात हॉटेल्स कॉर्पोरेशन किंवा हयात हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स ही हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. या अमेरिकन कंपनीची भारतासह जगभरात लक्झरिअस हॉटेल्स आहेत. विस्तृत हॉटेल चेन सुरळीपणे चालवण्यासाठी कंपनीला कुशल मनुष्यबळाची गरज भासते. त्यासाठी वेळोवेळी कर्मचारी भरती केली जाते. सध्या नवी दिल्लीतील हयातमध्ये हॉटेल फायनान्स ऑपरेशन्स विभागात एका अनुभवी इंटर्नल ऑडिटरची गरज आहे. हा ऑडिटर हॉटेलमधील फायनान्स डायरेक्टरला मदत करेल. वस्तुनिष्ठ मूल्यमापन, प्रक्रिया सुधारणा उपाय, प्रभावी कम्युनिकेशन आणि प्रभावी अंतर्गत नियंत्रण मानकांची शिफारस करण्यासाठी आणि कॉम्प्लियन्स रेग्युलेशन पालन करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी इंटर्नल ऑडिटरवर असते. ‘स्टडी कॅफे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांसाठी मोठी खूशखबर; सरकारकडून मानधनात थेट इतक्या रुपयांनी वाढ पदाच्या जबाबदाऱ्या: - उमेदवार हा मान्य केलेल्या स्कोप गाईडन्सनुसार मॅनेजमेंट ऑपरेशन रिव्ह्यू (MOR) कार्यान्वित करण्यास सक्षम असावा. कंपनीचे रिस्क एरिया ओळखणं, त्यांचं मूल्यांकन करणं आणि वार्षिक ऑडिट प्लॅनच्या विकासासाठी त्यानं इनपुट दिली पाहिजेत. - समस्या ओळखणं, मुलाखती घेणं, पुराव्याचं पुनरावलोकन आणि विश्लेषण करणं, ऑडिट वर्कपेपर आणि अहवालांचे दस्तऐवजीकरण करणं इत्यादींसह ऑडिट प्रक्रिया पार पाडणं. - पुनरावलोकन केले जात असलेल्या बाबींसंबंधी स्वतंत्र निर्णय घेऊन शिफारसी विकसित करणं. - लेखी अहवाल आणि तोंडी सादरीकरणांद्वारे लेखापरीक्षण आणि कन्सल्टिंग प्रोजेक्ट्सचे रिपोर्ट्स वरिष्ठ स्तरावरील व्यवस्थापनाला कळवणं. - ऑडिट चाचणी प्रक्रियेमध्ये डेटा विश्लेषणाचा वापर वाढवण्याच्या संधी ओळखणं. - विविध ऑर्गनायझेशनल प्रोजेक्ट टीम्ससह अंतर्गत ऑडिटचं प्रतिनिधित्व करणं. वैयक्तिक संपर्क आणि बैठकांद्वारे संपूर्ण कंपनीमध्ये प्रॉडक्टिव्ह रिलेशनशीप विकसित करणं आणि टिकवून ठेवणं. - 70 टक्के कामासाठी प्रवास करावा लागेल. परिस्थिती आणि आवश्यकतांनुसार ही जबाबदारी बदलू शकते. प्रामुख्याने कंपनीच्या भारतातील हॉटेल्सना भेटी द्याव्या लागतील. पण, गरज पडल्यास आफ्रिका आणि मध्य पूर्व प्रदेशांतील हॉटेल्सचा यात समावेश असेल. भयंकर परिस्थिती! देशात लहान-मोठ्या कॉलेजमधील इंजिनिअर्स बेकार; जॉबसाठी कंपन्यांनी फिरवली पाठ; पण का? पात्रता: - ऑडिटिंग, अकाउंटिंग किंवा बिझनेस विश्लेषणामध्ये 3 ते 5 वर्षे पूर्णवेळ काम केल्याचा अनुभव. - अकाउंटिंग, फायनान्स किंवा हॉस्पिटॅलिटीमध्ये बॅचलर किंवा पदव्युत्तर पदवी. - इंग्रजी भाषेवर प्रभूत्व असणं गरजेचं आहे. एखादी अतिरिक्त भाषा येत असल्यास उत्तम. - हॉटेल अकाउंटिंग किंवा बाह्य ऑडिटचा अनुभव. बिग फोर अकाउंटिंग फर्मचा अनुभव असल्यास प्राधान्य. - CPA, CIA, CISA किंवा चार्टर्ड अकाउंटंट म्हणून प्रमाणपत्र आवश्यक. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी, हयातच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.