मुंबई, 13, जून: महागाई आणि मंदी यांसारख्या समस्यांमुळे तरुणांच्या नोकऱ्यांवर परिणाम होताना दिसत आहे. विशेषत: टियर 2 आणि टियर 3 युनिव्हर्सिटींमधून ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना जास्त अडचणी येत आहेत. या वर्षी आर्थिक मंदी आणि एमएनसी कॉर्पोरेशनमधील कर्मचारी कपातीमुळे या विद्यार्थ्यांना योग्य प्लेसमेंट मिळणं कठीण होत आहे. या उलट, शहरातील अग्रगण्य इंजिनीअरिंग संस्थांमधून ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी भरमसाट पगाराच्या नोकऱ्या मिळवत आहेत. मात्र, याच संस्थांमधील कॉम्प्युटर सायन्स (सीएस) आणि इन्फॉर्मेशन सायन्स (आयएस) व्यतिरिक्त इतर शाखांतील विद्यार्थ्यांना चांगली नोकरी मिळवताना कसरत करावी लागत आहे. फर्म्सचे रिक्रुटर्स प्लेसमेंट आयोजित करण्यासाठी कॅम्पसमध्ये फिरकतदेखील नसल्याचं निरीक्षण विद्यार्थ्यांनी नोंदवलं आहे. ‘टेक गिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कोरमंगला येथील एका खासगी इंजिनीअरिंग कॉलेजमधील विद्यार्थिनीनं सांगितलं की, आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेत होतो तेव्हा संस्थेनं हमी दिली होती की आम्हा सर्वांना नोकऱ्या मिळतील. प्रत्यक्षात मात्र, कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन (ईसी) विभागातील विद्यार्थ्यांची भरती करण्यासाठी फक्त तीन कॉर्पोरेशन्सनं कॅम्पसला भेट दिली आहे. सध्या ईसी क्षेत्रात खूपच मर्यादित संस्था कार्यरत आहेत. सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाची परिस्थिती फार बिकट आहे. तिथे रिक्रुटर्स आले नाहीत. ज्या काही कंपन्या येत आहेत त्या स्टार्ट-अप्स स्वरुपाच्या आहेत. अशा कंपन्या दरवर्षी चार लाख भारतीय रुपयांचे पॅकेज देतात. Top 5 Medical Colleges: ‘हे’ आहेत राज्यातील टॉप मेडिकल कॉलेजेस; NEET UG 2023 च्या मार्कांवर थेट मिळेल प्रवेश विनिता एस.च्या म्हणण्यानुसार, “गेल्या चार वर्षांची आमची सदस्यत्वाची थकबाकी रक्कम यापेक्षा जास्त आहे.” ती पुढे म्हणाली की, विद्यार्थी सध्या त्यांच्या भविष्याविषयी खूप चिंतीत आहेत. कारण, कॅम्पसबाहेर फारसे जॉब फेअर आयोजित केले जात नाहीत. त्यामुळे कॅम्पसबाहेर थेट नोकरभरती होण्याची शक्यता फारच कमी आहे. काही युनिव्हर्सिटींमधील ज्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाल्याची सूचना मिळाली आहे त्यांना अद्याप ऑफर लेटर मिळाली नाहीत. याचं ठोस कारणही दिलं जात नाही. राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांसाठी मोठी खूशखबर; सरकारकडून मानधनात थेट इतक्या रुपयांनी वाढ बेंगळुरूमधील बन्नेरघट्टा रोडवरील एका इंजिनीअरिंग कॉलेजमधील विद्यार्थिनी सहाना के. म्हणाली, “कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम ही दोन अशी क्षेत्रं आहेत तिथे प्रत्येक मोठ्या कंपनीला नवीन कर्मचार्यांची गरज भासत आहे. त्यामुळे त्यांनी कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन सिस्टीमसह इतर विभागांतील विद्यार्थ्यांच्याही मुलाखती घेतल्या आहेत. पण, अशा विद्यार्थ्यांना प्रोग्रॅमिंग आणि कोडिंगचे ज्ञान असावं अशी त्यांची अट आहे. विशेष म्हणजे इतर शाखांमधील अभ्यासक्रमांमध्ये हे विषय नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रोग्रॅमिंग आणि कोडिंगशी संबंधच येत नाही. आतापर्यंत माझ्या बॅचमधील फक्त पाच जणांना प्लेसमेंटमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यापैकी तीन लोकांना ऑफर लेटर देण्यात आलेली नाहीत.” ती पुढे असंही म्हणाली की, कॉलेज प्रशासन आपल्या विद्यार्थ्यांच्या ऑफर लेटरसाठी पाठपुरावा करत नाही. उलट विद्यार्थ्यांनाच फर्मशी संपर्क साधण्याची विनंती करत आहे.
मंदी आणि टाळेबंदीच्या समस्यांव्यतिरिक्त कोविड-19 महामारीदेखील विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. काही विद्यार्थ्यांनी असं निरीक्षण नोंदवलं आहे की, त्यांना ‘कोविड बॅच’ म्हणून संबोधलं जात आहे. ज्याचा संदर्भ व्हर्च्युअल मोड वापराद्वारे शैक्षणिक प्रशिक्षण पूर्ण करण्याशी आहे. या विद्यार्थ्यांकडे पुरेशी कौशल्यं नसल्याचं रिक्रुटर्सचं मत आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कॉलेजनं या समस्येवर मदत करण्यासाठी त्यांना पुरेसं प्लेसमेंट प्रशिक्षण दिलं नाही, म्हणून जास्त अडचणी येत आहेत.