जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांसाठी मोठी खूशखबर; सरकारकडून मानधनात थेट इतक्या रुपयांनी वाढ

राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांसाठी मोठी खूशखबर; सरकारकडून मानधनात थेट इतक्या रुपयांनी वाढ

कंत्राटी ग्रामसेवकांसाठी मोठी खूशखबर

कंत्राटी ग्रामसेवकांसाठी मोठी खूशखबर

कंत्राटी ग्रामसेवकांचं मानधन थेट 10,000 रुपयांनी वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे ग्रामसेवकांसाठी हा मोठा दिलासा आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13, जून: महाराष्ट्र सरकारची कॅबिनेट मिटिंग आज पार पडली. यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे आणि काही इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या कॅबिनेट मीटिंगमध्ये राज्यातील सर्व मंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीमध्ये कंत्राटी ग्रामसेवकांसाठी मोठी खूशखबर समोर आली आहे. कंत्राटी ग्रामसेवकांचं मानधन थेट 10,000 रुपयांनी वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे ग्रामसेवकांसाठी हा मोठा दिलासा आहे. Top 5 Medical Colleges: ‘हे’ आहेत राज्यातील टॉप मेडिकल कॉलेजेस; NEET UG 2023 च्या मार्कांवर थेट मिळेल प्रवेश तसंच कॅबिनेटच्या या बैठकीमध्ये इतरही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना दिलासा देणारे काही निर्णय या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्यात येणार आहे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीही वाढवण्यात आली आहे. Success Story: अवघ्या 18 रुपये रुपये पगारावर घासले भांडे, टेबलही पुसले; आज ते आहेत 300 कोटींच्या कंपनीचे मालक महाराष्ट्र सरकार लातूर इथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार असल्याचा निर्णय मंजूर करण्यात आला आहे. पुणे इथे चार अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयं स्थापन करणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे. स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढवली जाणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार असून 1500 कोटींची मदत देण्यात येणार असल्याची माहिती आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात