JOIN US
मराठी बातम्या / करिअर / फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन; ऑफिसच्या पहिल्याच दिवशी सर्वांना इम्प्रेस करायचंय? मग 'हे' नियम पाळाच

फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन; ऑफिसच्या पहिल्याच दिवशी सर्वांना इम्प्रेस करायचंय? मग 'हे' नियम पाळाच

तज्ज्ञांच्या मते, आपण पहिल्या भेटीत सहा गोष्टींच्या आधारे लोकांवर छाप पाडतो. या ठिकाणी अशा सहा गोष्टींबद्दल माहिती देण्यात आली आहे

जाहिरात

आताच फॉलो करा या टिप्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 एप्रिल :  सायकॉलॉजिस्टच्या मते, आपण पहिल्याच भेटीत समोरच्या व्यक्तीला जज करतो. कारण, आपलं मन आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशिक्षित असतं. त्यामुळे आपल्या समोरच्या व्यक्तीला जज करतो आणि इच्छा नसतानाही समोरच्या व्यक्तीबद्दल नक्कीच काहीतरी गृहीत धरतो. तज्ज्ञांच्या मते, आपण पहिल्या भेटीत सहा गोष्टींच्या आधारे लोकांवर छाप पाडतो. या ठिकाणी अशा सहा गोष्टींबद्दल माहिती देण्यात आली आहे ज्यांच्या आधारे आपण एकमेकांना जज करत असतो. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 1. चेहऱ्यावरील एक्सप्रेशन: एखाद्याशी बोलताना तुमच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्सवरून लोक तुम्हाला जज करतात. जेव्हा तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा भेटता आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू येत नाही, तेव्हा समोरच्याला असं वाटू शकतं की, तुम्ही त्याला अनिच्छेनं भेटत आहात. एखाद्याला हसतमुखानं भेटल्यास समोरच्या व्यक्तीला तुम्ही सकारात्मक वाटता. या उलट, जर तुमच्या चेहऱ्यावर निराशा किंवा काळजी असेल तर समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल नकारात्मकता जाणवू शकते. एअर फोर्समधील पायलटला नक्की किती मिळतो पगार? कशी असते सिलेक्शन प्रोसेस? इथे मिळेल A-Z माहिती 2. बोलण्याची पद्धत: तज्ज्ञांच्या मते, लोक तुमच्या बोलण्याच्या पद्धतीनुसार तुम्हाला जज करतात. विशेषत: जेव्हा समोरच्या व्यक्तीशी पहिल्या भेटीत तुम्ही तुमच्या खूप गोष्टी शेअर करता तेव्हा त्या व्यक्तीला तुम्ही जेन्युइन व्यक्ती वाटू शकता. ते तुम्हाला विश्वास ठेवण्यायोग्य मानतात. मात्र, काही लोक तुम्हाला अटेंशन सीकरही मानू शकतात. 3. कलर चॉईस: एखाद्या व्यक्तीसोबतच्या पहिल्या भेटीत तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालता त्यावरूनही तुम्हाला जज केलं जातं. जेव्हा तुम्ही फिक्या रंगाचे कपडे घालता, तेव्हा लोकांचा असा समज होतो की तुम्ही मैत्रीपूर्ण आहात. या उलट तुम्ही जर गडद रंगाचे कपडे घातले असतील तर तुम्ही लोकांवर अधिकार गाजवणारी व्यक्ती आहात असा आभास होतो. तज्ज्ञांच्या मते, जे लोक निळे कपडे घालतात ते प्रभावशाली असतात. 1-2 नाही तर देशातील ‘या’ विद्यापीठात तब्बल 700 जागांसाठी भरतीची घोषणा; तुम्ही आहात का पात्र? करा अप्लाय 4. फोन वापरण्याची पद्धत: आजच्या डिजिटल युगात प्रत्येकजण फोन वापरतो. फोनशिवाय जगणं जवळजवळ अशक्य झालं आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ज्या पद्धतीने फोन वापरता त्यावरून लोक तुम्हाला जज करतात. जर तुम्ही एखाद्याशी संभाषण करत असताना वारंवार तुमच्या फोनकडे पाहत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या वेळेचा आदर करत नाही, असा समज होतो. जर तुम्ही फोन जास्त वापरत असाल तर समोरच्या व्यक्तीच्या मनात असा समज तयार होतो की, तुम्ही विश्वासार्ह व्यक्ती नाही. ज्यांचं फक्त नाव घेतलं तरी गुन्हेगारांच्या अंगाचा उडतो थरकाप; कोण आहेत या ‘मर्दानी लेडी सुपरकॉप’? 5. स्वत:बद्दल किती बोलता: जर तुम्ही एखाद्याला पहिल्यांदाच भेटत असाल आणि प्रत्येक गोष्ट गोलगोल फिरून स्वत:शीच जोडत असाल, तर समोरच्या व्यक्तीला तुम्ही गर्विष्ठ व्यक्ती असल्याचं वाटतं. तुम्ही फक्त तुमच्याबद्दलच बोलल्यानं समोरची व्यक्ती तुमच्यावर नाराज होऊ शकते.

6. डोळ्यांत बघून बोलणं: जर तुम्ही एखाद्याशी बोलत असाल आणि त्याच्याकडे पाहण्याऐवजी तुम्ही इकडे तिकडे पाहत असाल तर असं दिसून येईल की तुम्ही या भेटीबद्दल अस्वस्थ आहात. या उलट, जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या थेट डोळ्यांत बघून बोलता तेव्हा तुमच्यात आत्मविश्वास असल्याचं दिसतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या