JOIN US
मराठी बातम्या / करिअर / GAIL Recruitment: तब्बल 60,000 रुपये पगार आणि सरकारी नोकरी; चान्स सोडूच नका; करा अप्लाय

GAIL Recruitment: तब्बल 60,000 रुपये पगार आणि सरकारी नोकरी; चान्स सोडूच नका; करा अप्लाय

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून 120 जागा भरल्या जाणार आहेत. कंपनीच्या प्रोजेक्ट रिक्वायरमेंटनुसार रिक्त जागांची संख्या कमी किंवा जास्त होऊ शकते.

जाहिरात

GAIL Recruitment

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मार्च:  GAIL गॅस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने सीनिअर व ज्युनिअर असोसिएट पोस्टसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार gailgas.com. या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख आज 10 मार्च संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून 120 जागा भरल्या जाणार आहेत. कंपनीच्या प्रोजेक्ट रिक्वायरमेंटनुसार रिक्त जागांची संख्या कमी किंवा जास्त होऊ शकते. इच्छुक फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतात. “एखाद्या उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्‍यास, सादर केलेला लेटेस्ट अर्ज या जाहिरातीच्या दृष्टीने विचारात घेतला जाईल. या नंतरचा कोणताही अर्ज विचारात घेतला जाणार नाही,” असं अधिकृत नोटीसमध्ये म्हटलंय. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; ‘तो’ पेपर पुन्हा होणार नाही; थेट द्यावी लागेल पुरवणी परीक्षा GAIL Gas Recruitment 2023: रिक्त जागा सीनिअर असोसिएट (टेक्निकल): 72 जागा ज्युनिअर असोसिएट (टेक्निकल): 16 जागा सीनिअर असोसिएट (फायर & सेफ्टी): 12 जागा सीनिअर असोसिएट (मार्केटिंग): 6 जागा सीनिअर असोसिएट (फायनान्स & अकाउंट्स): 6 जागा सीनिअर असोसिएट (ह्युमन रिसोर्स): 6 जागा सीनिअर असोसिएट (कंपनी सेक्रेटरी): 2 जागा Government Jobs: तब्बल 1,42,000 रुपये पगार अन् थेट रेल्वे मंत्रालयात नोकरी; तुम्ही आहात का पात्र? करा चेक GAIL Gas Recruitment 2023: पात्रतेचे निकष 1. सीनिअर असोसिएट (टेक्निकल): अर्ज करणार्‍या उमेदवारांनी इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/प्रॉडक्शन/प्रॉडक्शन अँड इंडस्ट्रीअल मॅन्युफॅक्चरिंग/मेकॅनिकल अँड ऑटोमोबाईल/इंस्ट्रुमेंटेशन/इंस्ट्रुमेंटेशन किंवा इतर कोणत्याही विशिष्ट ट्रेडमध्ये किमान 50 टक्के गुणांसह पूर्णवेळ इंजिनीअरिंगची डिग्री घेतलेली असावी. 2. सीनिअर असोसिएट (फायर & सेफ्टी): यासाठी अर्ज करणाऱ्यांनी फुल टाइम बॅचलर्स डिग्री फायर व सेफ्टी इंजिनीअरिंगमध्ये किमान 50 टक्के गुणांसह पूर्ण केलेली असावी. 3. सीनिअर असोसिएट (मार्केटिंग): दोन वर्षांचं फुल टाइम MBA मार्केटिंग किंवा ऑइल, गॅस पेट्रोलियम व एनर्जी अँड इन्स्फ्रास्ट्रक्चर/इंटरनॅशनल बिझनेसमध्ये केलं असावं. यात किमान 50 टक्के मार्क्स असावेत. डिग्रीपर्यंत शिक्षण नाही तरीही उभी केली जगातील सर्वात मोठी कंपनी; गॅरेजमधून झाली होती सुरुवात या संदर्भात सविस्तर माहिती रिक्रुटमेंट नोटिफिकेशनमध्ये दिली आहे. GAIL Gas Recruitment 2023: अॅप्लिकेशन फी जनरल/EWS/OBC (NCL) कॅटेगरीतील उमेदवारांना 100 रुपये अॅप्लिकेशन फी भरावी लागेल. तर ST/SC आणि PwBD कॅटेगरीतील उमेदवारांना कोणतीही अॅप्लिकेशन फी नाही.

GAIL Gas Recruitment 2023: सिलेक्शन प्रोसेस सीनिअर असोसिएट पदासाठी लेखी परीक्षा व मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड केली जाईल. तर, ज्युनिअर असोसिएटसाठी लेखी परीक्षेसह स्कील टेस्ट घेतली जाईल. GAIL Gas Recruitment 2023: पगार सीनिअर असोसिएट्ससाठी पगार 60,000 रुपये प्रतिमहिना आहे. ज्युनिअर असोसिएट्ससाठी दरमहा 40,000 रुपये आहे. यामध्ये पगार, हाउस रेंट अलाउन्स (HRA) आणि इतर भत्ते समाविष्ट आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या