जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'तो' पेपर पुन्हा होणार नाही; थेट द्यावी लागेल पुरवणी परीक्षा

10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'तो' पेपर पुन्हा होणार नाही; थेट द्यावी लागेल पुरवणी परीक्षा

थेट पुरवणी परीक्षेत द्यावा लागणार

थेट पुरवणी परीक्षेत द्यावा लागणार

शकडो विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर मुकला आहे. मात्र आता हा पेपर नेमका कधी होणार? या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का? याबाबत बोर्डानं मोठा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 मार्च: महाराष्ट्र स्टेट बोर्डाची सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा सुरु आहे. मात्र यंदा बोराच्या परीक्षांमध्ये घोटाळे कमी होण्याचं नाव घेत नाहीये. कधी इंग्रजीच्या पेअरमध्ये चूक तर कधी हिंदीच्या. पण आता अजबच प्रकार घडला आहे. शकडो विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर मुकला आहे. मात्र आता हा पेपर नेमका कधी होणार? या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का? याबाबत बोर्डानं मोठा निर्णय घेतला आहे. नेमकं घडलं काय? दहावीचा हिंदीचा पेपर हा 8 मार्चला होणार होता मात्र सोशल मीडियावर एक वेळापत्रक व्हायरल झालं आणि त्यात हिंदीचा पेपर 9 मार्चला आहे असं सांगण्यात आलं. त्यामुळं राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचा हा पेपर मुकला आहे. मात्र आता अशा वियार्थ्यांचं काय होणार? असा प्रश सर्वांचं पडला आहे. जो ऐपत मुकला आहे तो परत घेण्यात येणार का? अशी शंका आहे. Government Jobs: तब्बल 1,42,000 रुपये पगार अन् थेट रेल्वे मंत्रालयात नोकरी; तुम्ही आहात का पात्र? करा चेक कोणत्याही सोशल मीडियावर आलेल्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेऊ नका, जोपर्यंत बोडाकडून घोषणा होत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट खरी मानू नका असं बोर्डानं परीक्षा सुरु होण्याच्या आधीच वारंवार सांगितलं होतं. मात्र तरीही विद्यार्थ्यांनी अशा खोट्या वेळापत्रकावर विश्वास ठेऊन परीक्षेला आले नाहीत. त्यामुळे ही बोर्डाची चूक नाही असं बोर्डाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. डिग्रीपर्यंत शिक्षण नाही तरीही उभी केली जगातील सर्वात मोठी कंपनी; गॅरेजमधून झाली होती सुरुवात कधी देता येणार पेपर? विद्यार्थ्यांच्या चुकीमुळे हा पेपर मुकला आहे असं बोर्डाचं म्हणणं आहे त्यामुळे हा पेपर पुन्हा घेता येणार नाही. म्हणूनच ज्या विद्यार्थ्यांचा हा हिंदीचा पेपर मुकला आहे अशा विद्यार्थ्यांना आता पेपर हा पुरवणी परीक्षेत द्यावा लागणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

तरीही अकरावीत मिळेल प्रवेश जरी या विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर हा पुरवी परीक्षेत जुलैमध्ये होणार असला तरी अशा विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळू शकणार आहे. बोर्डाच्या परीक्षेत तुमचे दोन विषय बॅक असतील तरी तुम्हाला अकरावीत प्रवेश मिळू शकतो. ATKT च्या नियमांप्रमाणे विद्यार्थ्याना प्रवेश मिळू शकणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात